Cyber Fraud Dainik Gomantak
देश

Cyber Fraud: दिल्लीत ईडीची मोठी कारवाई; 5 हजार कोटींची सायबर फसवणूक करणारा आशिष कक्कर गजाआड

Ashish Kakkar Arrested In Delhi: आशिष कक्कर हा सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे. त्याने सायबर गुन्हे आणि ऑनलाइन गेमिंगमधून 4,978 कोटी रुपयांचा काळा पैसा कमावला होता.

Manish Jadhav

Ashish Kakkar Arrested In Delhi: राजधानी दिल्लीत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे 5,000 कोटी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या आशिष कक्करला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष कक्कर हा सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे. त्याने सायबर गुन्हे आणि ऑनलाइन गेमिंगमधून 4,978 कोटी रुपयांचा काळा पैसा कमावला होता.

दरम्यान, सायबर ठग आशिष कक्कर हा एका मोठ्या सिंडिकेटचा म्होरक्या आहे. 2020 ते 2024 पर्यंत त्याने ऑनलाइन गेमिंग आणि इतर सायबर गुन्ह्यांमधून 4,978 कोटी रुपयांची फसवणूक केली. त्याचे रॅकेट एक-दोन राज्यातच नाही तर संपूर्ण देशात पसरले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मिळालेल्या माहितीनुसार, आशिष कक्कर हा दिल्लीतील ग्रेटर कैलासचा रहिवासी आहे. ईडीने त्याला 2 मार्च रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा 2002 च्या कलम 19 अंतर्गत गुरुग्राम येथून अटक केली.

दुसऱ्या प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्ली-एनसीआरमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांच्या कुटुंबाचा कथित 'जवळचा सहकारी' अमित कात्याल याने प्रमोट केलेल्या रियल्टी आणि मद्य कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंगची (Money Laundering) चौकशी केली.

कथित 'नोकरीच्या बदल्यात रेल्वेची जमीन' घोटाळ्याप्रकरणी ईडीने कात्याल यांना गेल्या वर्षी अटक केली होती. प्रसाद, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुलगी आणि खासदार मीसा भारती आणि इतर काही जण या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे.

सूत्रांनी सांगितले की, दिल्ली, गुरुग्राम आणि सोनीपतमधील 'कृष्णा बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेड'च्या एकूण 27 परिसरांची मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार शोध घेण्यात येत आहे. या कंपनीचे प्रवर्तक अमित कात्याल आणि राजेश कात्याल आहेत. ही कंपनी हरियाणातून चालते.

सूत्रांनी सांगितले की, ईडीचा तपास कंपनीच्या प्रवर्तकांकडून 400 कोटी रुपयांच्या घर खरेदीदारांच्या निधीचा कथित गैरव्यवहार आणि परदेशात पळवून नेल्याचा आहे. अमित कात्यालने घर खरेदीदारांचे 200 कोटींहून अधिक पैसे श्रीलंकेला पाठवल्याचा आरोप ईडीने केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा कृष्णा कात्याल याने आपला भारतीय पासपोर्ट (Passport) अधिकाऱ्यांना सरेंडर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT