Bihar Dainik Gomantak
देश

Bihar: एकाच परिसरातील 40 महिलांच्या पतीचं नाव 'रुपचंद', जातनिहाय गणनेत झाला खुलासा

बिहारमधील अरवाल जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे 40 महिलांना एकच पती आहे. ज्याचे नाव 'रुपचंद' आहे.

Manish Jadhav

Bihar: बिहारमधील अरवाल जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे 40 महिलांना एकच पती आहे. ज्याचे नाव 'रुपचंद' आहे. येथे होत असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या दुसऱ्या फेरीत हा खुलासा झाला आहे.

अरवाल जिल्ह्यातील एका रेड लाइट एरियामध्ये सुमारे 40 महिलांनी 'रुपचंद' नावाच्या व्यक्तीचा उल्लेख पती म्हणून केला आहे. जनगणना करत असलेल्या अधिकाऱ्यांनी मुलांना विचारले असता त्यांनीही आपल्या वडिलांचे नाव 'रुपचंद' असे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक वर्षांपासून नाच-गाणी करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नर्तिका महिलांचे वास्तव्य आहे.

ज्यांना कोणताही आसरा नाही, त्यामुळे या महिलांनी आपल्या पतीचे नाव रुपचंद असे सांगितले. ही घटना आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

दरम्यान, बिहारमधील (Bihar) अरवाल जिल्ह्यात जातनिहाय जनगणनेदरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. शहरी भागातील रेड लाईट एरियातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक व्यक्ती सुमारे 40 महिलांचा पती आहे.

प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी महिलांना त्यांच्या पतीचे नाव विचारले असता सुमारे 40 महिलांनी त्यांच्या पतीचे नाव 'रुपचंद' असल्याचे सांगितले. याशिवाय सर्व मुलांनी देखील आपल्या वडिलांचे नाव 'रुपचंद, असे सांगितले.

वास्तविक, सध्या बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरु आहे. या दरम्यान अधिकारी घरोघरी जाऊन लोकांची प्रत्यक्ष पडताळणी करुन त्यांची माहिती घेत आहेत. नगर परिषद परिसरातील वॉर्ड क्रमांक 7 रेड लाईट एरियात अधिकारी पोहोचले असता सुमारे 40 महिलांनी (Women) त्यांच्या पतीचे नाव ‘रुपचंद’ असे सांगितले.

रेड लाईट एरियामधील प्रकरण

राजीव रंजन राकेश यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून रेड लाईट एरियात नाच-गाणी करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नर्तिका महिलांचे वास्तव्य आहे. ज्यांना कोणताही आसरा नाही. अशा सर्व स्त्रिया रुपचंदला आपला पती मानतात, ज्याला आजपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही.

तसेच, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन जातनिहाय जनगणना करु नये, असे म्हटले होते. केंद्राने सांगितले की, जातींची गणना करणे हे क्लिष्ठ आणि अवघड काम आहे.

असे असतानाही नितीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. बिहारमध्ये घरोघरी जाऊन जातनिहाय जनगणना केली जात आहे, त्यानंतर ही बाब समोर आली. परंतु लोक वारंवार एकच प्रश्नच उपस्थित करत आहेत की, 'रुपचंद' कोण आहे, ज्याला इतक्या बायका आणि मुले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT