Bihar Viral Video: बिहारमध्ये 'माफिया राज'! वाळू माफियांकडून महिला खाण निरीक्षकाला गंभीर मारहाण

महिला अधिकारीही रस्त्यावर पडल्यानंतरही वाळू माफिया महिला अधिकाऱ्याला मारत राहिले.
Bihar Viral Video
Bihar Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Bihar Crime News: बिहारमध्ये कायदा आणि प्रशासन याचा धाक आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी एक घटना सध्या समोर आली आहे. बिहारमध्ये वाळू माफियांचे मनोधैर्य इतके वाढले आहे की सोमवारी त्यांनी खनिकर्म विभागाच्या महिला निरीक्षकाला बेदम मारहाण केली.

महिला निरीक्षक पळत राहिली आणि वाळू माफिया तिचा पाठलाग करत राहिले. महिला अधिकारीही रस्त्यावर पडल्यानंतरही वाळू माफिया महिला अधिकाऱ्याला मारत राहिले.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहटा पोलीस ठाण्यातील पारेव येथे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी पोहोचलेल्या पोलीस आणि खनिकर्म विभागाच्या पथकावर हल्लेखोरांनी हल्ला केला.

या हल्ल्यात खाण खात्याच्या महिला निरीक्षकासह अन्य कर्मचारी जखमी झाले. माहिती मिळताच आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सिटी एसपी वेस्ट राजेश कुमारही घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी अनेकांना अटक झाल्याची बातमी आहे.

Bihar Viral Video
G20 Summit 2023 In Goa: 'वैद्यकीय पर्यटनासाठी भारत नेहमीच अग्रेसर'; गोव्यातील G20 बैठकीच्या पहिल्या दिवशी काय झालं?

खनिकर्म विभागाच्या महिला निरीक्षक त्यांच्या पथकासह ओव्हरलोड वाळूने भरलेल्या वाहनांची तपासणी करत होत्या. दरम्यान, ट्रकचालक आणि स्थानिक वाळू माफियांनी त्यांच्यावर हल्ला केला. घटनेनंतर सिटी एसपी राजेश कुमार, एएसपी दानापूर अभिनव धीमान, एएसपी पालीगंज अवधेश दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली एसडीएम आणि पाटणा डीटीओचे अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 44 जणांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com