Deputy Chief Minister Manish Sisodia Dainik Gomantak
देश

2000 कोटींचा घोटाळा! सत्येंद्र जैन यांच्यानंतर मनिष सिसोदिया ईडीच्या रडारावर

देशातील राजकारण (Politics) मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. केंद्रीय एजन्सी अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांवर धाडी टाकत आहेत. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दावा केला की, 'आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक होऊ शकते.' (Arvind Kejriwal claims that Deputy Chief Minister Manish Sisodia may be arrested after Satyendra Jain)

केजरीवाल म्हणाले की, 'त्यांना कोणत्याही खोट्या प्रकरणात गोवले जाऊ शकते.' आता आम आदमी पक्षानेही (Aam Aadmi Party) सांगितले आहे की, 'सिसोदिया यांना तुरुंगात पाठवले जाण्याची शक्यता आहे. सिसोदिया यांना गोवण्यासाठी केंद्राने 3 वर्षे जुने प्रकरण उभे करण्याचा कट रचला आहे.'

दरम्यान, आप नेत्या आतिशी यांनी मीडिया ब्रीफिंग दरम्यान दावा केला की, 'केंद्राने त्यांच्या सर्व तपास यंत्रणा, आयकर, अंमलबजावणी संचालनालय (Ed), दिल्ली पोलीस आणि सीबीआयला (CBI) सिसोदिया यांना अटक करण्यासाठी 'बनावट' खटल्याची तयारी सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य आणि वीज यासह विविध विभाग हाताळणारे सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने “कोणत्याही नव्या पुराव्याशिवाय” एका प्रकरणात अटक केली आहे.'

बांधकामात घोटाळा झाल्याची तक्रार

आतिशी यांनी एक कथित कागदपत्र दाखवले, ज्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (ACB) भाजपच्या (BJP) दिल्ली युनिटचे नेते हरीश खुराना आणि नीलकांत बक्षी यांच्याकडून दाखल केलेल्या तक्रारीच्या संदर्भात अतिरिक्त तपशील आणि कागदपत्रे मागितली होती. या दोन्ही भाजप नेत्यांनी सिसोदिया आणि जैन यांचा शाळांच्या वर्गखोल्या आणि इमारतींच्या बांधकामात 2000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार केली होती. 2 जुलै 2019 रोजी पोलिस उपायुक्त, नवी दिल्ली यांना तक्रार करण्यात आली, जी एसीबीकडे पाठवण्यात आली.

3 वर्षे केस कुठे होती असे विचारले : अतिशी

आतिशी म्हणाल्या की, “गेली 3 वर्षे हे प्रकरण कुठे होते? यात भ्रष्टाचार झाला नसल्याचे सर्व यंत्रणांना माहीत आहे. केंद्र आप आमदारांच्या मागे का आहे?" त्या पुढे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री (Arvind) केजरीवाल यांनी काही महिन्यांपूर्वी जैन यांच्या अटकेची भीती व्यक्त केली होती आणि तेच घडले. आता सिसोदिया यांना अटक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT