"जर 1 टक्के सत्य असेल तर"..., सत्येंद्र जैन यांच्या अटकेवर अरविंद केजरीवाल म्हणाले

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना राउज एवेन्यू कोर्टने 9 जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना राउज एवेन्यू कोर्टने 9 जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सत्येंद्र जैन यांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, सत्येंद्र जैन यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की, 'हा खटला 2017 पासून सुरु आहे. जे काही आरोप करण्यात आले आहेत, ते पूर्णपणे निराधार आहेत. जैन यांच्या वकिलांनी पुढे सांगितले की, 'आरोग्य मंत्री तपास यंत्रणेला सहकार्य करत आहेत. तपास यंत्रणेचा तपास ज्या वेगाने सुरु आहे, तो कुणापासूनही लपून राहिलेला नाही.' आरोपांमध्ये एक टक्काही सत्य असते तर मी आधी कारवाई केली असती, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (Arvind Kejriwal has reacted to the arrest of Delhi Health Minister Satyendra Jain)

दरम्यान, जैन यांना ईडीने कथित मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणाबाबत सीएम केजरीवाल म्हणाले, "हे पूर्णपणे खोटे प्रकरण आहे. आमचे सरकार पूर्णपणे प्रामाणिक आहे. हा एक अतिशय प्रामाणिक पक्ष आहे. आम्ही एका पैशाचाही भ्रष्टाचार सहन करत नाही. तुम्ही पंजाबमध्ये (Punjab) नुकतेच पाहिले आहे. मंत्र्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग होते आणि कोणत्याही एजन्सीला, विरोधी पक्षाला किंवा मीडियाला याची माहिती नव्हती, आम्ही हवे असते तर ते दाबू शकलो असतो, परंतु आम्ही स्वतः त्या मंत्र्यावर कारवाई करुन त्यांना अटक केली.''

Arvind Kejriwal
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना 9 जूनपर्यंत ईडी कोठडीत

केजरीवाल (Arvind Kejriwal) पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये (Delhi) 5 वर्षांपूर्वी जे घडले होते, तसेच आमच्या एका मंत्र्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आम्हाला मिळाली होती. मी त्यांना मंत्रालयातून बडतर्फ केले आणि सीबीआयलाही पत्र लिहिले. आम्ही कोणत्याही एजन्सीची वाट पाहत नाही, आम्ही कारवाई करतो. दुसरीकडे, आपण हे देखील पाहतो की केंद्रीय एजन्सी कारवाई करतात. त्या राजकीय हेतूने प्रेरित आहेत. म्हणून मी सत्येंद्र जैन यांच्या प्रकरणाचा वैयक्तिक अभ्यास केला आहे, हे पूर्णपणे खोटे प्रकरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com