दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने केली अटक

मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली अटक
Satyendra Kumar Jain
Satyendra Kumar JainDainik Gomantak
Published on
Updated on

अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढवताना भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्यावर देशवासियांना आश्वस्वस्त केले आहे. आम आदमी पार्टी ही कधीच भ्रष्टाचाराला थारा देणार नाही. आणि भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना ही थारा देणार नाही. असे ही केजरीवाल यांनी देशवासियांना आश्वासन दिले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपुर्वी आपच्या एका मंत्र्याला भ्रष्टाचारामूळे पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यानंतर पुन्हा एकदा दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली आहे. यामूळे दिल्ली सरकारच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे. (Delhi Health Minister Satyendra Jain arrested by ED )

ईडीने सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतले आणि नंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली. त्यानंतर काही वेळातच त्यांना अटक करण्यात आली. जैन यांना 4 कोटी 81 लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 2014-15 मध्ये सत्येंद्र जैन मंत्रिपदावर असताना त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कलकत्त्याच्या शेल कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.

Satyendra Kumar Jain
एलपीजी गॅस किमत 1 जून पासून वाढण्याची शक्यता

या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करून अनेकवेळा त्यांची चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना या संदर्भात विचारणा केली असता, प्रश्नाची योग्य उत्तर देत नव्हते. माहिती लपवत होते. या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईनंतर आपने भाजपवर निशाणा साधला आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, सत्येंद्र जैन यांच्यावर 8 वर्षांपासून खोटा खटला सुरू आहे. आतापर्यंत ईडीने अनेकवेळा त्यांना चौकशीसाठी बोलावले आले आहे. दरम्यान, अनेक वर्षे काहीही न मिळाल्याने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले नाही. आता पुन्हा सुरुवात झाली कारण सत्येंद्र जैन हे हिमाचलचे निवडणूक प्रभारी आहेत. ते पुढे म्हणाले, हिमाचलमध्ये भाजपचा पराभव होत आहे. त्यामुळेच सत्येंद्र जैन हिमाचलला जाऊ नये म्हणून त्यांना आज अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण पूर्णपणे खोटे असल्याने काही दिवसांत त्यांची सुटका होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com