Rudra Helicopter  Dainik Gomantak
देश

Army Helicopter Crashes: अरूणाचल प्रदेशात लष्कराचे 'रूद्र' हेलिकॉप्टर कोसळले

अपघात झालेले ठिकाण शहराच्या मुख्यालयापासून 140 किलोमीटरवर

गोमन्तक डिजिटल टीम

Army Helicopter Crashes: अरूणाचल प्रदेशात शुक्रवारी लष्कराचे अॅडव्हान्स्ड लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर रूद्र कोसळले. अप्पर सियांग जिल्ह्यात हा अपघात घडला. बचाव पथकांना घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.

लष्कराच्या टुटिंग येथील मुख्यालयापासून 25 किलोमीटरवर असलेल्या सिंगिंग या गावाजवळ हा अपघात घडला आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला आहे, तो अत्यंत दुर्गम भाग आहे. तिथे जायला रस्ता नाही. हेलिकॉप्टरमधील प्रवाशांबाबत काहीही माहिती आत्तापर्यंत उपलब्ध झालेली नाही, अप्पर सियांग जिल्ह्याचे उपायुक्त शाश्वत सौरभ यांनी दिली.

अपघात घडलेल्या स्थळापासून जवळचे गाव हे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यिंगकियाँग येथून 140 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहचण्यासाठी काही तासांचा कालावधी लागू शकतो. घटनास्थळी बचावपथके पाठवली आहेत. एकदा ते पथक घटनास्थळी पोहचले की, पुढील तपशील मिळू शकेल, अशी माहिती, अप्पर सियांगचे पोलिस अधीक्षक जुम्मर बसार यांनी दिली.

दरम्यान, या महिन्याच्या सुरवातीलात अरूणाचल प्रदेशच्या तवांग येथे लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात भारतीय लष्करातील पायलटचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपुर्वीच केदारनाथ धाम येथे खासगी एजन्सीच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. यात भाविकांसह पायलटचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT