PM Narendra Modi In Kedarnath
PM Narendra Modi In Kedarnath Dainik Gomantak

PM Narendra Modi: केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदी पारंपरिक हिमाचली टोपी, चोला-डोरा पोशाखात

केदारनाथाच्या गाभाऱ्यात पुजा; बद्रीनाथच्या दर्शनालाही जाणार
Published on

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त उत्तराखंडातील केदारनाथाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या गर्भगृहात मोदींनी 20 मिनिटे पुजा केली. त्यानंतर त्यांनी मंदिराबाहेरील परिसराची पाहणी केली.

PM Narendra Modi In Kedarnath
India Weather Forecast : पुढच्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार; विविध राज्यात पावसाचा कहर

पंतप्रधान झाल्यानंतर केदारनाथला येण्याची ही मोदींची सहावी वेळ आहे. विशेष म्हणजे मोदींनी यावेळी खास पोशाख परिधान केला होता. मोदींनी हिमाचली टोपी आणि चोला डोरा हा पोशाख परिधान केला होता. हिमाचलच्या चंबा येथील दौऱ्यात महिलांनी हा पोशाख पंतप्रधान मोदींना गिफ्ट केला होता. या पोशाखाच्या पाठीवरील बाजूस स्वस्तिक चिन्ह देखील होते.

मंदिरातील दर्शनानंतर मोदींनी आदी शंकराचार्यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. शंकराचार्यांची १२ फूट उंचीची ही प्रतिमा २८ टन वजनाची आहे. म्हैसूर येथील ग्रेनाईटपासून ही मुर्ती बनवली गेली आहे. मोदींनी मंदिरात नंदीची पुजा केली. त्यानंतर त्यांनी गाभाऱ्यात मंत्रोच्चारात पुजा केली. पुजेनंतर मंदिराबाहेर येऊन मोदींनी उपस्थित लोकांना अभिवादन केले.

PM Narendra Modi In Kedarnath
Elon Musk Twitter Deal: एलन मस्क ट्विटरच्या 5500 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार?

दरम्यान, मोदी 3400 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजनही करत आहेत. यात एका गौरीकुंडला केदारनाथशी जोडणाऱ्या 9.7 किलोमीटर लांबीच्या रोप वेचे उद्घाटन करतील. या रोप वे मुळे सहा तासांचा प्रवास 30 मिनिटात होणार आहे. हा जगातील सर्वात मोठ्या लांबीच्या रोप वे पैकी एक आहे. मोदी बद्रीनाथलाही जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांचा हा केदारनाथ येथे सहावा दौरा आहे. यापुर्वी २०१७ मध्ये ते येथे दोन वेळा आले होते. तेव्हाही त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम संपल्यानंतर मोदी केदारनाथला गेले होते. तेव्हा संपुर्ण एक रात्र ते येथील गुहेत ध्यान लावून बसले होते. त्यांचा गुहेतील ध्यानस्थ फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com