Burning Train In Mexico: मेक्सिकोत बर्निंग ट्रेनचा थरार; भर शहरातून धावली पेटती रेल्वे

मालगाडीला इंधन वाहुन नेणाऱ्या टँकरची धडक; 1500 जणांना सुरक्षित स्थळी हलवले
Burning Train In Mexico
Burning Train In Mexico Dainik Gomantak
Published on
Updated on

Burning Train In Mexico: मेक्सिको येथील अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक मालगाडी आणि इंधन वाहून नेणाऱ्या टँकरची धडक होऊन येथे भीषण अपघात घडला. यातून मालगाडीने पेट घेतला आणि ही पेटती मालगाडी रूळांवरून भर शहरातून तशीच धावत राहिली. मेक्सिकोतील अॅग्वास्कालिएंटीस शहरात ही घटना घडली आहे.

Burning Train In Mexico
Elon Musk Twitter Deal: एलन मस्क ट्विटरच्या 5500 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार?

मालगाडीला बसलेली टँकरची धडक इतकी जोरदार होती की, रेल्वेने पेट घेतला. पण आगींच्या ज्वाळांनी वेढलेली ही रेल्वे थांबली नाही, तर रूळांवरून तशीच धावत राहिली. भर शहरातून ही पेटती रेल्वे धावली. तिच्या झळा आजुबाजूच्या घरांनाही बसल्या. त्यामुळे काही घरांचे नुकसानही झाले आहे.

पोलिसांनी टँकरच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. सुदैवाने या अपघातात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. तथापि, अनेक लोक जखमी झाले आहे. शहराचे महापौर लियो माँटेनेयूज म्हणाले की, रेल्वे ज्या भागातून धावली तेथील काही घरांचे आगीमुळे नुकसान झाले आहे.

या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये दिसते की, टँकर आणि मालगाडीच्या धडकेनंतर टँकर पलटी झाला आणि टँकरसह रेल्वेला आग लागली. अचानक झालेल्या या अपघाताने घटनास्थळी गदारोळ माजला. लोकांनी जीव वाचविण्यासाठी तत्काळ सुरक्षित स्थळी धाव घेतली. घटनास्थळी असलेल्या अनेक गाड्यांनाही या आगीमुळे पेट घेतला. अनेक कार्स या आगीत खाक झाल्या आहेत.

Burning Train In Mexico
Anand Mahindra: ब्रिटनच्या PM लिझ ट्रस यांचा राजीनामा, आनंद महिंद्रांचं ट्विट चर्चेत

अॅग्वास्कालिएंटिसच्या अग्निशमन दलाचे प्रमुख मिगुएल मुरिलो म्हणाले की, रेल्वे क्रॉसिंगजवळ हा अपघात घडला. आग वेगाने पसरली. आम्ही तेथील १२ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. त्यातील अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळाजवळील १५०० लोकांना सुरक्षित स्थळी स्थानांतरित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com