Indian Army Dainik Gomantak
देश

पाकच्या नापाक कृत्यावर पाणी फेरलं, LOC वर घुसखोरीचा प्रयत्न

भारतीय जवानांनी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: भारतीय जवानांनी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला आहे. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी बुधवारी पहाटे सांगितले की, 12-13 जुलैच्या मध्यरात्री पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, सीमेवर आमच्या जवानांनी सतर्क राहून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, असेही ते म्हणाले. याबाबत क्षणोक्षणी माहिती घेतली जात असल्याचे देवेंद्र आनंद यांनी सांगितले. पुंछ जिल्ह्यात सुरु असलेली अमरनाथ यात्रा आणि या महिन्यात सुरु होणारी आगामी बुद्ध अमरनाथ यात्रा पाहता लष्कर आणि सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत.

दुसरीकडे, लाल बाजार येथील जीडी गोएंका शाळेबाहेर दहशतवाद्यांनी नाका पार्टीवर गोळीबार केला. मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, दहशतवादी (Terrorist) हल्ल्याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांच्या (Police) पथकाने परिसराची नाकेबंदी केली आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT