Army
ArmyDainik Gomantak

श्रीनगरच्या लालबाजारमध्ये पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला, एक ASI शहीद

जम्मू-काश्मीरचे श्रीनगर खोरे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे.
Published on

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरचे श्रीनगर खोरे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाल बाजारच्या सर्वात वर्दळीच्या भागात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नाका पार्टीवर हल्ला केला. या हल्ल्यात एक एएसआय शहीद झाला आहे. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे, लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने परिसराची नाकेबंदी करताना दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या (Srinagar) लाल बाजार परिसरात दहशतवादी हल्ला झाला. हा परिसर अत्यंत गजबजलेला मानला जातो. बाजारपेठ परिसरात पोलिसांच्या नाका पार्टीवर आधीच घातपाती हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी (Terrorists) हा हल्ला केला. या हल्ल्यात एएसआय मुश्ताक अहमद गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Army
Video: जम्मू-श्रीनगर महामार्गावर बोगद्याचा काही भाग कोसळला, 7 जण अडकले, बचावकार्य सुरू

दुसरीकडे, लाल बाजार येथील जीडी गोएंका शाळेबाहेर दहशतवाद्यांनी नाका पार्टीवर गोळीबार केला. मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांच्या (Police) पथकाने परिसराची नाकेबंदी केली आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com