Amit Shah  Dainik Gomantak
देश

Gujarat Election: गुजरातमध्ये भाजप सगळे रेकॉर्ड मोडणार, शहांनी वर्तवले भाकीत

Amit Shah: साणंद हा शहा यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो.

दैनिक गोमन्तक

Gujarat Election: पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) विजयी होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजप सर्व विक्रम मोडून गुजरातमध्ये बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा शहांनी केला आहे. सध्या भाजपचे चाणक्य म्हटल्या जाणार्‍या शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे कौतुक करत राज्याचे नशीब बदलल्याचे सांगितले.

दरम्यान, साणंद विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार कनुभाई पटेल हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा शहा त्यांच्यासोबत होते. पटेल हे कोळी समाजाचे असून ते साणंदचे विद्यमान आमदार आहेत. साणंद हा शहा यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो.

शहा पुढे म्हणाले की, "भाजप या विधानसभा निवडणुकीत मागील सर्व विक्रम मोडेल. आत्तापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकून आणि सर्वाधिक मताधिक्य मिळवून भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.''

शहा पुढे असेही म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यात अनेक विकासकामे केली आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बळकट झाली असून त्यांनी (मुख्यमंत्री पटेल) राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना दिली. आरोग्य, शिक्षण आणि विविध क्षेत्रांत सुधारणा केल्या आहेत. ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी मोदींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विकसित केलेले मॉडेल गुजरातचे मंत्री पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.''

दुसरीकडे, 182 सदस्यीय गुजरात (Gujarat) विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात साणंदसह 93 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे.

तसेच, भाजपने विद्यमान आमदार कनुभाई पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर, पक्षाचे स्थानिक नेते आणि सानंद कृषी उपज मंडी समितीचे (एपीएमसी) अध्यक्ष खेंगार पटेल, ज्यांना तिकीट मिळण्याची आशा होती, त्यांनी कनुभाई पटेल यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

तथापि, शहा यांची भेट घेतल्यानंतर, खेंगार पटेल यांनी निवडणूक लढवण्याची योजना सोडली आणि कनुभाई पटेल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत गेले.

"एपीएमसीचे अध्यक्ष खेंगारभाई यांनी यापूर्वी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली असली तरी (लढण्यासाठी) त्यांनी भाजपच्या आवाहनाचा आदर केला याचा आम्हाला आनंद आहे," असेही शहा म्हणाले. गेल्या निवडणुकीपेक्षा ही जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल याची मला खात्री आहे, असेही शहा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT