Gujarat Election: रेल्वे नाही तर मतदान नाही! गुजरातमधील 18 गावातील ग्रामस्थांचा निर्धार

रेल्वेस्थानकासह ठिकठिकाणी बॅनरबाजी; भाजपसह काँग्रेस नेत्यांनाही गावात प्रचारावर बंदी
Gujarat Election
Gujarat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणूक मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे येथे राजकीय तापमान वाढू लागले आहे. आता नवसारी विधानसभा मतदारसंघातील 18 गावातील लोकांनी सर्वच पक्षांची चिंता वाढवून ठेवली आहे. या गावांमध्ये सत्ताधारी भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली आहे.

(Navsari Assembly constituency)

Gujarat Election
Army Chief Manoj Pande: चीनने सीमेवरील सैन्यात घट केली नाही; परिस्थिती कधीही बदलू शकते!

या 18 गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गावात सर्व पक्षीय नेत्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला या गावांमध्ये प्रचार करता येत नाहीय. या ग्रामस्थांची एक मागणी खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. ग्रामस्थ आंचेली येथे रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन थांबविण्याची मागणी करत आहे.

पण ही मागणी पुर्ण केली गेलेली नाही. त्यामुळे हे ग्रामस्थ नाराज आहेत. या स्थानकावर आणि इतर रेल्वे स्थानकांवरही ग्रामस्थांनी बॅनर लावले आहेत. ट्रेन नाही तर मत नाही, असा इशाराच या बॅनरवरून दिला आहे.

Gujarat Election
Pakistan's Drones : सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीत तब्बल 250 टक्क्यांची वाढ

काय म्हणणे आहे ग्रामस्थांचे?

ग्रामस्थ म्हणताहेत की, रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन थांबवली जात नसल्याने अनेक अडचणी येतात. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी जाण्याासाठी किमान 300 रूपये लागतात. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीही अडचणी येत आहेत. त्यांना कॉलेजला जायला विलंब होतो. विशेष कोरोना महारोगराईपुर्वी येथे रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन थांबत होत्या. आता सर्वकाही पुर्ववत झालेले असतानाही येथे लोकल ट्रेन थांबत नाही आहेत. त्यामुळे येथे लोकल ट्रेन थांबवली नाही तर मतदानादिवशी कुणीही मतदान करण्यासाठी जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com