Gujarat Election: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसशिवाय आम आदमी पार्टी (AAP) देखील पूर्ण ताकद लावत आहे. कोणाचे सरकार स्थापन होणार आणि विरोधी पक्षात कोण बसणार, याचा निर्णय 8 डिसेंबरला मतमोजणीनंतर होणार असून, सध्या सर्वच पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. सर्व सर्व्हे एजन्सी पुन्हा एकदा भाजपच्या विजयाचे भाकीत करत असताना, काँग्रेस आणि आप सरकार स्थापनेचा दावा करत आहेत.
दरम्यान, काँग्रेस आणि आपमध्ये भाजपविरोधी (BJP) मतांची विभागणी होऊ शकते, असेही मानले जात आहे. अशा परिस्थितीत भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास काँग्रेस आणि आप एकत्र सरकार स्थापन करु शकतील का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या मदतीने दिल्लीत पहिल्यांदाच सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि जनतेच्या इच्छेमुळेच आपण असे केल्याचे सांगितले.
माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, गरज पडल्यास काँग्रेससोबत (Congress) सरकार स्थापन करणार का, असे विचारले असता केजरीवाल हसले आणि म्हणाले की, "अभी तो आप शुभ-शुभ बोलिये." आमचे सरकार स्वबळावर स्थापन व्हावे यासाठी प्रार्थना करा.”
दुसरीकडे, दिल्लीत काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, “मी जनतेला विचारले होते. दिल्लीच्या निवडणुकीनंतर त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याबाबत मी नाखूष होतो. त्यानंतर दिल्लीतील प्रत्येक गल्लीबोळात जाऊन बैठका घेतल्या.''
केजरीवाल पुढे म्हणाले की, '49 दिवसांचे सरकार होते. सरकार स्थापन होताच दिल्लीकरांचे वीज बिल माफ केले होते. संपूर्ण दिल्लीचे पाणी बिल माफ करण्यात आले होते. भ्रष्टाचार संपला. 49 दिवसांत कोणता रोमँटिसिझम झाला. लोक म्हणायचे की ही अनिल कपूरच्या 'नायक' फिल्मची स्टाइल आहे. त्यामुळेच 49 दिवसात लोकांनी आम्हाला 67 जागा दिल्या. काम केले म्हणून जनतेने आम्हाला पुन्हा मतदान केले.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.