Amarnath Yatra 2023: Dainik Gomantak
देश

Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेदरम्यान 'या' पदार्थांवर बॅन,वाचा संपुर्ण लिस्ट एका क्लिकवर

अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होत आहे. यापूर्वीही अमरनाथ श्राइन बोर्डाने यात्रेकरूंसाठी फास्ट फूडसह अनेक खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे.

Puja Bonkile

Amarnath Yatra 2023: पुढील महिन्यात 1 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. 62 दिवस चालणारा हा प्रवास 31 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे. जर तुम्ही चांगल्या गोड पदार्थ खाण्याचे शौकीन असाल आणि यावर्षी अमरनाथ यात्रेला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. यंदाच्या अमरनाथ यात्रेत तेलकट, गोड, फास्ट फुडवर बॅन करण्यात आले आहे.

अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) ने या वर्षीच्या यात्रेसाठी फास्ट फूडवर बॅन आणले आहे. कारण उंचीशी संबंधित आरोग्यविषयक (Health) समस्या निर्माण होउ शकतात. अमरनाथ यात्रेकरूंसाठी तेलकट आणि फास्ट फूडवर बोर्डाने पूर्णपणे बॅन आणले आहे.

लंगर, संस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, दुकाने आणि इतर आस्थापनांमधून कोणत्याही प्रतिबंधित वस्तूंची विक्री केली जाणार नाही असे बोर्ड व्यवस्थापनाकडून जारी करण्यात आलेल्या कडक सूचनांमध्ये म्हटले आहे. 

जम्मू, पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यांतील बेस कॅम्पपासून यात्रा मार्गावर, पहलगामपासून 42 किमीचा मार्ग आणि 14 किमी लांबीच्या बालटाल ट्रॅकवर लंगर उभारले जात आहेत. बोर्डाच्या व्यवस्थापनाने प्रवाशांसाठी आरोग्य सल्लागार जारी केला आहे. प्रवास पूर्ण नीट करण्यासाठी प्रवाशांनी काही खाद्यपदार्थांचे सेवन टाळावेत.

  • या वस्तूंवर बंदी

गंदेरबल आणि अनंतनाग जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी श्राइन बोर्डाला योग्य आदेश जारी करण्यास सांगितले आहे. ज्यामध्ये यात्रेकरूंसाठी दिलेल्या भोजन मेनूचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावण्यात येणारा दंड निर्दिष्ट केला आहे. आरोग्य सल्लागारानुसार श्राइन बोर्डाने पुढिल पदार्थांवर बंदी घातली आहे.

पुरी

पिझ्झा

बर्गर

भरलेले पराठे

डोसे

ब्रेड विथ बटर

मलईचे पदार्थ

लोणचे

चटण्या

तळलेले पापड

चाउमीन

अशा सर्व प्रकारच्या फास्ट फूडवर बंदी घालण्यात आली आहे. शीतपेय देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच काही गोड खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे.

हलवा

जिलेबी

गुलाब जामुन

लाडू

खवा बर्फी

रसगुल्ला

कुरकुरीत स्नॅक्स, चिप्स, नमकीन, पकोडा, समोसा, तळलेले ड्रायफ्रुट्स आणि इतर सर्व तळलेले पदार्थ समाविष्ट आहेत. याशिवाय यात्रेत सर्व मांसाहारी पदार्थ, दारू, तंबाखू, गुटखा, पान मसाला, धूम्रपान आणि इतर मादक पदार्थांवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.

  • या पुढिल पदार्थांचे करता येइल सेवन

यावेळी प्रवासात हर्बल टी, लो फॅट दूध, लिंबूपाणी, भाज्यांचे सूप घेता येईल. फ्राईड राइस बंदी आहे. परंतु लोक सामान्य शिजवलेले भात खाऊ शकतात. याशिवाय तळलेले हरभरे, पोहे, उत्तपम, इडली, डाळ-रोटी असे हलके पदार्थ खाऊ शकतात. चॉकलेट, खीर, ड्रायफ्रुट्स, मध यांचेही सेवन करता येते.यात्रेदरम्यान 14 किलोमीटर लांब मार्गावर चालताना यात्री पूर्णपणे ऊर्जावान राहावे. त्यांचे स्वास्थ उत्तम राहावे. यासाठी हे बदल करण्यात आले आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने लोकांना प्रवास करताना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो आणि या आरोग्याशी संबंधित परिस्थितीमुळे लोकांचा मृत्यू देखील होतो. आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचना लक्षात घेऊन नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रवासादरम्यान मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, ज्याचे कारण जीवनशैली आणि अन्न समस्या आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

SCROLL FOR NEXT