Air India Plane Crash Dainik Gomantak
देश

Air India Plane Crash: दैव बलवत्तर! एअर इंडिया विमान अपघातातून एकजण वाचला, रुग्णालयात उपचार सुरु; Video

Air India Plane Crash Survivor: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी (12 जून) उड्डाणानंतर काही अंतरावर भीषण अपघात झाला. या प्रवासी विमानातून तब्बल 242 लोक प्रवास करत होते. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. मात्र या दुर्घटनेत त्यांच्यासह 241 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी (12 जून) उड्डाणानंतर काही अंतरावर भीषण अपघात झाला. या प्रवासी विमानातून तब्बल 242 लोक प्रवास करत होते. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. मात्र या दुर्घटनेत 241 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये रुपाणी यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या विमान अपघातातून एकजण वाचला असल्याचा दावा आता केला जात आहे. या प्रवाशावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. अपघातादरम्यान त्याने सावधगिरीने विमानाच्या एक्झिट खिडकीतून उडी मारुन आपला जीव वाचवला असल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. वाचलेल्या या प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे.

वाचलेल्या प्रवाशाने सांगितली आपबिती

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातातून (Accident) वाचलेल्या प्रवाशाचे नाव रमेश विश्वकुमार असे आहे. तो 11 ए विमानाच्या सीटवर बसला होता. त्याच्यावर सध्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. घटनेदरम्यान सावधगिरीने विमानातून उडी मारल्याने आपला जीव वाचल्याचे त्याने माध्यमाशी बोलताना सांगितले. तो म्हणाला की, 'आधी ब्लास्ट झाला. त्यानंतर विमान कोसळले. टेकऑफनंतर अवघ्या 30 सेकंदात विमान कोसळले.'

तो पुढे बोलताना म्हणाला की, 'मी जेव्हा जागा झालो तेव्हा माझ्या शेजारी इतर प्रवाशांचे मृतदेह होते. मी ते पाहून घाबरलो आणि तिथून पळ काढला. माझ्या आजूबाजूला अपघातग्रस्त विमानाचे तुकडेही पडलेले होते. याचदरम्यान मला कोणीतरी पकडून रुग्णवाहिकेत टाकून नेले.'

विमान उड्डाण करताच अपघात झाला

एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) नुसार, एअर इंडियाच्या (Air India) एआय-171 या विमानाने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:39 वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरुन उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या हद्दीबाहेर जमिनीवर कोसळले. अहमदाबादमधील मेघनगर आयजीपी कॉम्प्लेक्समध्ये हे विमान कोसळले. अपघाताच्या वेळी विमानात 242 लोक होते, ज्यात केबिन क्रूच्या 10 सदस्यांचा समावेश होता.

विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल होते, ज्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8,200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर सह-वैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. अपघातानंतर अपघातस्थळाभोवतीचे सर्व रस्ते बंद करण्यात आले. अग्निशमन दलासह बचाव पथकांना बचाव आणि मदत कार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले. याशिवाय, रुग्णालयात सुमारे 1200 खाटांची व्यवस्था करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Goa Live News: साखळी येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT