After Sri Lanka-Thailand, Visa-free entry for Indians in Malaysia too:
परदेशात पर्यटनास जाण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारत आणि चीनच्या पर्यटकांना १ डिसेंबरपासून मलेशियामध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे.
अशा परिस्थितीत, आता तुम्हाला परदेशी पर्यटनाचे नियोजन करण्यासाठी व्हिसाची चिंता करण्याची गरज नाही.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी रविवारी रात्री उशिरा त्यांच्या पीपल्स जस्टिस पार्टीच्या काँग्रेसमधील भाषणादरम्यान भारत आणि चीनी पर्यटकांना देशात व्हिसा फ्री प्रवेश देण्यावर शिक्केमोर्तब केले.
अन्वर इब्राहिम यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत, चिनी आणि भारतीय नागरिक 30 दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय मलेशियामध्ये राहू शकतात. तथापि, मोफत व्हिसा प्रवेश किती काळ लागू राहील हे त्यांनी सांगितले नाही.
भारतीयांना थायलंड आणि श्रीलंकेत आधीच व्हिसा फ्री एंट्रीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आता असे करणारा मलेशिया हा तिसरा आशियाई देश बनला आहे.
यापूर्वी मलेशियाने कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, यूएई, तुर्की, जॉर्डन आणि इराण या देशांना ही सूट दिली होती. मात्र, हे सर्व मुस्लिम देश होते.
चीन आणि भारत ही मलेशियाची अनुक्रमे चौथी आणि पाचवी सर्वात मोठी स्रोत बाजारपेठ आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, मलेशियामध्ये या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान 9.16 दशलक्ष पर्यटक आले, त्यात चीनमधील 498,540 पर्यटक आणि भारतातील 283,885 पर्यटकांचा समावेश आहे.
कोविड साथीच्या आजारापूर्वी 2019 मध्ये याच कालावधीत चीनमधून 1.5 दशलक्ष आणि भारतातून 354,486 पर्यटकांनी मलेशियाला भेटी दिल्या होत्या.
शेजारील देश थायलंडने आपल्या महत्त्वपूर्ण पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि त्याच्या सुस्त अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लागू केलेल्या नियमांनंतर मलेशियाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
यंदाच्या सवलतीच्या यादीत चिनी आणि भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. सध्या चिनी आणि भारतीय नागरिकांना मलेशियामध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करावा लागतो.
मलेशिया हा विषुववृत्ताजवळ वसलेला एक सुंदर आग्नेय आशियाई देश आहे. दोन भिन्न प्रदेश एकत्र करून तयार केलेला हा देश आहे; एक म्हणजे प्रायद्वीप मलेशिया आणि पूर्व मलेशिया.
क्वालालंपूर ही त्याची राजधानी आहे आणि पुत्रजया हे प्रशासकीय केंद्र आहे. मलेशिया हा एक ब्रिटिश प्रदेश होता आणि ऑगस्ट 1965 मध्ये तो स्वतंत्र देश बनला.
मलेशिया हे दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठे पर्यटन आकर्षण आहे आणि मलेशिया टूर पॅकेज हा किवर्ड इंटरनेटवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्यापैकी एक आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक या सुंदर देशाला भेट देतात आणि एक्सप्लोर करतात. मलेशियामध्ये खरोखरच जगातील काही आकर्षक पर्यटन स्थळे आहेत. मलेशिया हे विविधतेचे ठिकाण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.