Abhishek Banerjee Dainik Gomantak
देश

बंगाल शिक्षक भरती घोटाळा: SC कडून दिलासा मिळाल्यानंतर अभिषेक बॅनर्जींना CBI चे समन्स

CBI Summons Abhishek Banerjee: अभिषेक बॅनर्जी यांना शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयने सोमवारी समन्स पाठवले.

Manish Jadhav

CBI Summons Abhishek Banerjee: ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयने सोमवारी समन्स पाठवले. त्यांना 17 एप्रिल रोजी कोलकाता येथील निजाम पॅलेसमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर सीबीआयचे हे समन्स आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली, ज्यात त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या निकवर्तीय मानले जाणारे तृणमूल नेते अनुब्रता मंडल यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये याच प्रकरणात अटक करण्यात आली होती.

24 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे

खरे तर, 13 एप्रिल रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाने आदेश दिला होता की, ईडी आणि सीबीआय गरज पडल्यास अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी करु शकतात.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय (CBI) आणि ईडी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही एफआयआर नोंदवू नये, असे निर्देशही उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना दिले होते.

दरम्यान, या आदेशाविरोधात अभिषेक बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठाने दोन्ही आदेशांना स्थगिती दिली आहे.

यासोबतच, पुढील सुनावणीसाठी 24 एप्रिलची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तोपर्यंत तपास यंत्रणा अभिषेकची चौकशी करु शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे शिक्षक भरती घोटाळा?

2014 मध्ये, स्कूल सर्विस कमीशनने सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची भरती केली. पार्थ चॅटर्जी त्यावेळी शिक्षणमंत्री होते. 2016 मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली.

याप्रकरणी अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यावर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. सीबीआयने 30 सप्टेंबर रोजी पहिले आरोपपत्र दाखल केले.

त्यात माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह 16 जणांची नावे होती. ईडीने पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली. पार्थ चॅटर्जी 23 जुलै 2022 पासून तुरुंगात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT