Mamata Banerjee सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, बाबुल सुप्रियो घेणार मंत्रीपदाची शपथ

Babul Supriyo: ममता बॅनर्जी सरकारमध्ये 9 नवीन मंत्री सामील होणार आहेत.
Babul Supriyo
Babul Supriyo Dainik Gomantak
Published on
Updated on

Mamata Banerjee Govt: ममता बॅनर्जी सरकारमध्ये 9 नवीन मंत्री सामील होणार आहेत. बंगाल सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदलासंदर्भात ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवीन मंत्र्यांमध्ये बाबुल सुप्रियो यांचाही समावेश असेल, जे पूर्वी केंद्र सरकारचा एक भाग होते. परंतु काही महिन्यांपूर्वीच ते भाजप सोडून TMC मध्ये दाखल झाले. त्यांच्याशिवाय पार्थ भौमिक, स्नेहशिष चक्रवर्ती आणि अन्य काही नेत्यांनाही मंत्रिमंडळात प्रवेश दिला जाणार आहे. या नेत्यांना दुपारी चार वाजता राजभवनात बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, तिथे शपथविधी सोहळा होणार आहे.

दरम्यान, बंगाल सरकारमध्ये हा फेरबदल अशा वेळी करण्यात येत आहे, जेव्हा वरिष्ठ मंत्री पार्थ चॅटर्जी ईडीच्या (ED) ताब्यात आहेत. पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. इतकेच नाही तर त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 50 कोटी रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय फ्लॅट, बंगले, फार्म हाऊससह अनेक मालमत्तांचीही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, ही मालमत्ता अर्पिता आणि पार्थ यांची असल्याचे सांगितले जात आहे.

Babul Supriyo
पार्थ चॅटर्जींच्या अटकेनंतर Mamata Banerjee ची प्रतिक्रीया, जर कोणी दोषी असेल तर ...'

दुसरीकडे, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या पंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी हा फेरबदल केल्याचे मानले जात आहे. यातून त्या प्रादेशिक आणि सामाजिक समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत त्यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या अनेक नेत्यांना संघटनेत पाठवले आहे. याशिवाय संघटनेतील अनेक नेत्यांना सरकारचा भाग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यामध्ये एक बाबुल सुप्रियो देखील आहेत, जे काही महिन्यांपूर्वी भाजप (BJP) सोडून टीएमसीमध्ये (TMC) दाखल झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com