Akhilesh Yadav's New Pension Offer Dainik Gomantak
देश

मला निवडून द्या! जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करेन

बुधवारी, सपा प्रमुखांनी वचन दिले की समाजवादी पेन्शन योजनेअंतर्गत, वंचित पार्श्वभूमीतील महिलांना त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास सध्याच्या 6,000 रुपयांच्या तुलनेत वर्षाला 18,000 रुपये मिळतील.

दैनिक गोमन्तक

निवडणूक आश्वासनांची आणखी एक यादी जाहीर करताना, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी गुरुवारी सांगितले की, फेब्रुवारी-मार्च विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) त्यांचा भाग सत्तेवर आल्यास विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांना बहाल करण्यात आलेले यश भारती पुरस्कार पुन्हा चालू केले जातील.

मुलायम सिंह सरकारच्या काळात 1995 मध्ये यश भारती पुरस्कार देऊन लोकांचा सन्मान करण्याची योजना सुरू करण्यात आली होती. जेव्हा आमचे सरकार पुन्हा स्थापन होईल, तेव्हा आम्ही हे पुरस्कार पुन्हा सुरू करू आणि तो आमच्या जाहीरनाम्याचा भाग असेल, असे वक्तव्य अखिलेश यांनी केले आहे. 2007-12 मध्ये मायावती सरकारने आणि नंतर भाजपने बंद केलेले हे पुरस्कार राज्य आणि जिल्हा स्तरावर दिले जातील, असे ही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्र्यांनी वृद्ध आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनाही जाहीर केल्या होत्या. वृद्धांसाठीच्या पेन्शन (Pension) योजनेबाबत त्यांनी, आर्थिक तज्ञांशी चर्चा केली आहे. बुधवारी, सपा प्रमुखांनी वचन दिले की समाजवादी पेन्शन योजनेअंतर्गत, वंचित पार्श्वभूमीतील महिलांना त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास सध्याच्या 6,000 रुपयांच्या तुलनेत वर्षाला 18,000 रुपये मिळतील.

अखिलेश यांनी भाजपला आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास सांगितले. आम्ही आमच्या उमेदवारांची नावे दिली आहेत आणि आम्ही भाजपला त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास सांगत आहोत. आमच्या जाहीरनाम्याचा भाग काय असेल ते आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT