Aero India 2023 Video Dainik Gomantak
देश

Aero India 2023: एरो इंडिया शोमध्ये विमानांचा आकाशात 'व्हॅलेंटाईन' ,पाहा व्हिडिओ

एरो इंडिया 2023 च्या या एअर शोमध्ये हवाई दलाच्या विमानांनी आपली ताकद दाखवली आहे.

दैनिक गोमन्तक

Aero India 2023: भारतातील सर्वात मोठ्या एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एअरो इंडियाचा 14 व्या हंगामाची सुरवात सोमवारी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी एरोबॅटिक डिस्प्ले करण्यात आला. यामध्ये, लढाऊ विमानांनी निळ्या आकाशात हार्ट आकार तयार केला, जो एरो इंडिया 2023 ला समर्पित होता. एरो इंडियाचा हा सुंदर हार्ट शेप जो कोणी पाहिला तो पाहतच राहिला. याशिवाय लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर 'प्रचंड'नेही एरोबॅटिक प्रदर्शनात भाग घेतला.

भारतातील (India) सर्वात मोठे एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन 'एरो इंडिया'च्या 14व्या आवृत्तीला सोमवारी म्हणजेच आज सुरुवात झाली. शोचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले, 'एरो इंडिया' हा केवळ शो नाही, ही तर भारताची ताकद आहे.

भारत आज केवळ बाजारपेठच नाही तर अनेक देशांसाठी संभाव्य संरक्षण भागीदारही आहे. ते म्हणाले की, 21व्या शतकातील 'न्यू इंडिया' एकही संधी सोडणार नाही किंवा त्याच्या मेहनतीलाही कमी पडणार नाही.

  • मेक इन इंडिया मोहिमेला बळ मिळेल

पीएम मोदी म्हणाले, हा शो 'मेक इन इंडिया' मोहिमेला नवीन चालना देईल तसेच देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्राला नवी चालना देईल. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात एरोस्पेस आणि संरक्षण कंपन्यांचे प्रमुख प्रदर्शन आणि व्यापार मेळा तसेच विमान आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई प्रात्यक्षिके सादर केली जातील.

  • 809 संरक्षण कंपन्यांचा सहभाग

एअर शोमध्ये अमेरिकेचे (America) प्रतिनिधीत्व करताना, भारतातील अमेरिकेच्या राजदूत एलिझाबेथ जोन्स यांनी द्विवार्षिक कार्यक्रमाविषयी सांगितले की, "जसे भारत त्याच्या संरक्षण क्षमतेचे आधुनिकीकरण करत आहे. अर्थातच आम्हाला एक पसंतीचे भागीदार बनायचे आहे." 

आम्ही वाढत्या प्रमाणात परस्पर फायदेशीर सह-उत्पादन आणि सह-विकास भागीदारीवर लक्ष केंद्रित करत आहोत.' अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या बाहेरील हवाई दलाच्या यालाहंका लष्करी तळाच्या परिसरात 98 देशांतील 809 संरक्षण कंपन्या आणि प्रतिनिधी पाच दिवसीय प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT