Viral Video: पठ्ठ्याने वऱ्हाडासाठी बूक केले चक्क विमान...वऱ्हाडाचा विमानात कल्ला, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर एका फ्लाइटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video: भारतातील लग्न मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. लग्नासाठी परदेशी स्थळांपासून ते मोठमोठ्या राजवाड्यांपर्यंत ते आता सर्वसामान्य होऊ लागले आहेत. प्रत्येक जोडप्याचा हा प्रयत्न असतो की, त्यांना त्यांचे लग्न वर्षानुवर्षे आठवावे. एका वराने असेच काहीतरी करायचे ठरवले. लग्नाला जाण्यासाठी वराने आपले कुटुंबीय आणि नातेवाईकांसाठी संपूर्ण विमान बुक केले.

उत्साही पाहुण्यांनी भरलेल्या फ्लाइटचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शुभ वेडिंग या इस्टापेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  "दिवस 1: @drolia_shagun घरी जाण्यासाठी राइड करा" या कॅप्शनसह शुभ वेडिंग या पेजने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

वराचे कुटुंब खूप आनंदी

या व्हिडिओमध्ये (Video) वराचे कुटुंब आणि नातेवाईक विमानाच्या आत हात हलवत, जोरात टाळ्या वाजवताना आणि हार्ट शेप बनवताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये भुवन नावाचा उत्साही वर देखील हातावर मेंदी लावून कॅमेरासमोर मजेदार चेहरे करताना दिसत आहे. युजरने या लग्नाचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हे लग्न काठमांडू, नेपाळमध्ये झाल्याचे दिसत आहे.

Viral Video
Aero India Show 2023: हा केवळ शो नाही, ही तर भारताची ताकद... पंतप्रधान मोदींचे मत

17 दशलक्ष पेक्षा अधिक व्ह्युज

हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 17 लाख वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ लाईक करणाऱ्यांची संख्या 39 हजारांहून अधिक आहे. शेकडो युजर्संनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. 

संपूर्ण कुटुंब एकत्र फ्लाइटमध्ये चढताना पाहून इंस्टा युजर्स थक्क झाले आहेत. काही युजर्सनी फ्लाइटवर खर्च केलेल्या पैशाबद्दल बोलले, तर काहींनी ते अगदी सामान्यपणे पाहिले आहे.

युजर्सच्या प्रतिक्रीया

एका युजर्सने गंमतीने लिहिले, "मला आयुष्यात इतके पैसे कमवायचे आहेत." दुसर्‍याने लिहिले, "तुम्ही श्रीमंत आहात हे न सांगता दाखवा." तिसरा म्हणाला, "मी खरोखर उत्सुक आहे. त्याची किंमत किती आहे?"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com