Apple Dainik Gomantak
देश

World Famous आहेत हिमाचलचे सफरचंद; होतेय अ‍ॅडव्हांस बुकींग

दैनिक गोमन्तक

हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) अ‍ॅप्पलचे (Apple) म्हणजेच सफरचंदांचे राज्य म्हणून देखील ओळखला जाते. हिमाचलमध्ये सफरचंदांच्या सुमारे 200 प्रकारांची लागवड केली जाते, जी वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या दराने विकल्या जातात. मात्र या सर्व अ‍ॅप्पलमध्ये एक अशी प्रजाती आहे ज्या प्रजातीचे फळ तयार होण्याआधीच बुकींग केली जाते. सुप्रसिद्ध असलेल्या या अ‍ॅप्पलचे नाव किन्नरी अ‍ॅप्पल असे आहे. सफरचंद जेव्हा झाडावर वाढु लोगते तेव्हाच ते बुक केले जाते. किन्नौरी अ‍ॅप्पलची मागणी केवळ देशातच नाही तर परदेशात देखील आहे. (Advance bookings for Himalayan apples)

किन्नौरी अ‍ॅप्पलची स्वतःची बाजारपेठ आहे. त्याचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो, परंतु बुकिंग थेट जून किंवा जुलैपासुनच सुरु होते. हे सफरचंद बाजारात येण्यापूर्वी विकले जाते.या स्वादिष्ट आणि रसाळ अ‍ॅप्पलची स्पर्धा करण्यासाठी बऱ्याच परदेशी वाण बाजारात येतात, पण किन्नौरी सफरचंदचे बाजारपेठतले स्थान कायम आहे.

शिमला, मंडी आणि कुल्लू जिल्ह्यात सफरचंद हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये किन्नौर सफरचंदांचा पुरवठा सुरू होता. आधीपासून बाजारात हे ठरलेले असते की, असते हे सफरचंद कोण खरेदी करेल. दर हंगामात किन्नरी सफरचंदांचे 30 ते 40 लाख बॉक्स बाजारात पोहोचतात.

विशेष म्हणजे या एका बॉक्सची किंमत सुमारे 3500 ते 4000 असते. तर बाजारात या सफरचंदाची किंमत 200 रुपये किलोपेक्षा कमी नसते. पण एकदा किन्नौरी सफरचंद खाण्याची सवय झाली कि मग इतर सफरचंदांची चव येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT