CK Nayudu Trophy: 92 धावांत ऑलआउट! गोव्याच्या युवकांचे पंजाबसमोर सपशेल लोटांगण; यजमान संघावर फॉलोऑनची नामुष्की

Goa Vs Punjab : सऱ्या दिवशी पंजाबच्या पहिल्या डावातील ५ बाद ५३३ या प्रचंड मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना गोव्याचा पहिला डाव ९२ धावांत संपुष्टात आला.
Goa Vs Punjab
Goa Vs Punjab Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंजाबच्या फलंदाजांनी पाचशेहून जास्त धावा केलेल्या खेळपट्टीवर गोव्याच्या फलंदाजांनी साफ लोटांगण घातले, परिणामी कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील एलिट अ गट क्रिकेट सामन्यात यजमान संघावर फॉलोऑनची नामुष्की आली.

कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी पंजाबच्या पहिल्या डावातील ५ बाद ५३३ या प्रचंड मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना गोव्याचा पहिला डाव ९२ धावांत संपुष्टात आला.

Goa Vs Punjab
Ranji Trophy: गोव्याच्या गोलंदाजांची धुलाई! केरळच्या रोहन कुन्नुम्मलचे आक्रमक शतक; पाहुणा संघ आघाडीच्या दिशेने

४४१ धावांच्या पिछाडीनंतर फॉलोऑन मिळालेल्या गोव्याने दिवसअखेर १ बाद ५८ धावा केल्या होत्या. ते अजून ३८३ धावांनी मागे आहेत. सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत. गोव्याच्या फलंदाजांची यापूर्वीची मानसिकता लक्षात घेता, पंजाबला रविवारी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी डावाने विजय मिळविण्याची संधी आहे.

Goa Vs Punjab
C K Nayudu Trophy: गोव्याची पुन्हा एकदा हाराकिरी! बडोद्याविरुद्ध 236 धावांनी गमावला सामना; 4 सामन्यांतील दुसरा पराभव

संक्षिप्त धावफलक

पंजाब, पहिला डाव (१ बाद ४३५ वरुन) ः १०८.२ षटकांत ५ बाद ५३३ घोषित (हरनूरसिंग पन्नू २२८- २४८ चेंडू, २३ चौकार, ६ षटकार, युवी गोयल ११२- १४४ चेंडू, १२ चौकार, ३ षटकार, मयंक गुप्ता ५३, राहुल कुमार ३०, चिगुरुपती व्यंकट १६-३-६६-१, समर्थ राणे २१-३-१००-१, फरदीन खान १६-१-८८-०, कौशल हट्टंगडी १-०-१७-०, अनुज यादव ३२.२-१-१२८-२, मनीष काकोडे १८-०-१०५-१, अमन धूपर ४-०-१५-०).

Goa Vs Punjab
C K Nayudu Trophy: 17 चौकार, 13 षटकार! 'शिवेंद्र'च्या तडाख्यामुळे गोवा सुस्थितीत; मेघालयाविरुद्ध 270 धावांची आघाडी

गोवा, पहिला डाव ः ३९.४ षटकांत सर्वबाद ९२ (बन्सिल पंड्या १४, रिजुल पाठक १०, जीवनकुमार चित्तेम ०, आर्यन नार्वेकर १८, चिरुगुपती व्यंकट ४, कौशल हट्टंगडी १४, अमन धूपर २०, अनुज यादव ६, मनीष काकोडे ०, समर्थ राणे ०, फरदीन खान नाबाद ०, हरजससिंग टंडन १२-४-२९-२, देलव्ह गोयल १३-६-२६-५, हरवीत सिंग ४.४-१-१३-२).

गोवा, दुसरा डाव (फॉलोऑन) ः ३१ षटकांत १ बाद ५८ (बन्सिल पंड्या २७, रिजुल पाठक नाबाद ११, अनुज यादव नाबाद ८, हरजससिंग टंडन १४-९-२०-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com