Aditya-L1 Mission Dainik Gomantak
देश

Aditya-L1 ने चौथ्यांदा बदलली अवकाशातील कक्षा, 19 सप्टेंबरला अर्थ-बाउंड फायर

या ऑपरेशन दरम्यान, मॉरिशस, बेंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथे असलेल्या इस्रोच्या ग्राउंड स्टेशनवरून मिशनच्या संपूर्ण प्रक्रियेचा मागोवा घेण्यात आला आहे. यासाठी काही काळ थ्रस्टर्स सोडण्यात आले.

Ashutosh Masgaunde

Aditya-L1 changed orbit for the fourth time, Earth-bound fire on September 19:

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारताच्या पहिल्या सौर मिशन आदित्य-L1 बाबत नवी माहिती दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या पहिल्या अंतराळ-आधारित मोहिम आदित्य एल 1 ने शुक्रवारी आपली चौथी कक्षा बदलाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

इस्रोने म्हटले आहे की, या ऑपरेशन दरम्यान, मॉरिशस, बेंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथे असलेल्या इस्रोच्या ग्राउंड स्टेशनवरून मिशनच्या संपूर्ण प्रक्रियेचा मागोवा घेण्यात आला आहे. यासाठी काही काळ थ्रस्टर्स सोडण्यात आल्याची माहिती, इस्रोने ट्विटरवर दिली आहे.

इस्रोने असेही सांगितले की, ही नवीन कक्षा 256 किमी x 121973 किमी रुंद आहे. आदित्य-L1 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता Lagrange Point L1 च्या कक्षेत ठेवण्यासाठी त्याची कक्षा वाढवली जाईल.

याआधी तीन वेळा बदलली कक्षा

याआधी एल1 यानाने प्रथमच, 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11.45 च्या सुमारास कक्षा बदलली होती. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी आदित्य L1 ने दुसऱ्यांदा कक्षा बदलली होती.

10 सप्टेंबर रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास आदित्य एल1 यानची कक्षा तिसऱ्यांदा वाढवण्यात आली. त्यावेळी ते पृथ्वीपासून २९६ किमी x ७१,७६७ किमी अंतराच्या कक्षेत पाठवण्यात आले.

आदित्य-L1 पृथ्वीच्या कक्षेत 16 दिवस घालवेल आहेत असे इस्रोने म्हटले आहे. या 16 दिवसांत पाच वेळा आदित्य-एल1 ची कक्षा बदलण्यासाठी अर्थ बाउंड फायर करावा लागेल. .

आदित्य-एल1 2 सप्टेंबर रोजी लॉंच

ISRO ने 2 सप्टेंबर रोजी PSLV C57 लाँच व्हेइकलमधून आदित्य L1 लाँच केले. आदित्य-L1 ही भारताची पहिली सौर मोहीम आहे, जी सूर्य-पृथ्वी लॅग्रेंज पॉइंट L1 भोवतीच्या प्रभामंडल कक्षेतून सूर्याचा अभ्यास करेल. Lagrange Point L-1 पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT