Video: 'रामचरितमानसमध्ये अनेक चांगल्या गोष्टी परंतु काही "विषारी गोष्टी" देखील, शिक्षण मंत्र्याचे वादग्रस्त विधान

Chandrasekhar: चंद्रशेखर म्हणाले की, लालू यादव यांचा मुलगा आठवी पर्यंत शिकला यावरुन टीका करणारे लोक ५६ इंची छाती असलेल्या व्यक्तीकडून डीग्रीचे पुरावे का मागत नाहीत.
Bihar Education Minister Chandrasekhar
Bihar Education Minister ChandrasekharDainik Gomantak

Bihar Education Minister Chandrasekhar sparked controversy after he Said that the epic Ramacharitmanas "contains traces of potassium cyanide:

बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी रामायणावर आधारित असलेल्या रामचरितमानस या महाकाव्यामध्ये "पोटॅशियम सायनाइड (विष) सारखे काही अंश आहेत" असे विधान केल्याने पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे.

गुरुवारी हिंदी दिवस कार्यक्रमादरम्यान बोलताना चंद्रशेखर यांनी दावा केला की, रामचरितमानसमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत परंतु काही "विषारी गोष्टी" देखील आहेत.

"तुम्हाला पोटॅशियम सायनाइड मिसळलेले 55 खाद्य पदार्थ दिल्यास तुम्ही ते खाणार का? या प्रमाणेच हिंदू धर्मग्रंथांमध्ये पोटॅशियम सायनाइड नावाची गोष्ट आहे." असे विधान चंद्रशेखर यांनी केले.

ते पुढे म्हणाले, रामचरितमानसमध्ये पोटॅशियम सायनाइड आहे, जोपर्यंत ते अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्याचा विरोध सुरूच राहणार आहे.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अरविंद सिंह म्हणाले, "चंद्रशेखर हे सोशल सायनाइड आहेत. ते समाजात विष पसरवण्यासाठी कायम आतुर असतात. शिक्षणमंत्री हे शिक्षण आणि मानवतेसाठी सायनाइड आहेत.

ते रामचरितमानस आणि सनातन धर्माविरोधात सतत विधाने करत आहेत. त्यांना आणि त्यांच्या 9वी पास नेत्याला सनातन आणि रामचरितमानस समजलेले नाही. खरे तर RJD हा सामाजिक आणि राजकीय सायनाईड आहे जो समाजात भेद निर्माण करत आहे."

यापूर्वी जानेवारी महिन्यात चंद्रशेखर यांनी रामचरितमानस आणि मनुस्मृतीच्या विरोधात वक्तव्य केले होते आणि ही पुस्तके समाजात द्वेष पसरवतात असे म्हटले होते. तेव्हापासून ते रामचरितमानसच्या विरोधात सातत्याने वक्तव्ये करत आहेत.

चंद्रशेखर म्हणाले की, लालू यादव यांचा मुलगा आठवी पर्यंत शिकला यावरुन टीका करणारे लोक ५६ इंची छाती असलेल्या व्यक्तीकडून डीग्रीचे पुरावे का मागत नाहीत.

लालूजींच्या राजवटीत जंगलराज असते तर चौकीदाराप्रमाणे 56 इंची छाती असलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यावेळीही पदवी खरेदी केली असती. आपण खरे बोलणारे लोक आहोत.

लालूप्रसादांनी यादव आणि दलितांना आवाज दिला तेव्हा त्यांच्या विरोधात कट रचला गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com