Aditya L-1 Launch Dainik Gomantak
देश

Aditya L-1 Launch: चंद्रानंतर भारताला आता सूर्याचे वेध! आदित्य एल-1 झेपावण्यासाठी सज्ज

Aditya L-1 Launch: तर पृथ्वीच्या अवकाशातील वातावरणात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

Aditya L-1 Launch: चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारत आज आदित्य एल१ मिशनचे प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रामधून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे आदित्य एल-1 चे प्रक्षेपण केले जाईल. आज शनिवारी ( 2 सप्टेंबर 2023) 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य एल-1 प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहीती इस्रोकडून देण्यात आली आहे. सूर्याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 सूर्याकडे झेपावणार आहे.

  • आदित्य एल-1चा उद्देश काय आहे?

सूर्य हा पृथ्वीच्या जवळचा तारा आहे. त्यामुळे अन्य ताऱ्यांच्या तुलनेत सूर्याचा विस्ताराने अभ्यास करणे शक्य आहे. सूर्याच्या अभ्यासातून आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांविषयी अभ्यास करणे आणि जाणून घेणे सोपे होणार आहे, त्याचबरोबर इतर आकाशगंगेविषयीदेखील माहीती मिळवता येणार आहे.

सूर्य हा अत्यंत गतीशील तारा आहे. सौरमंडलामध्ये अनेक विस्फोटकारी घटना घडतात. जर असे काही विस्फोट सूर्याकडून पृथ्वीकडे आले तर पृथ्वीच्या अवकाशातील वातावरणात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

याआधीदेखील अनेक अंतराळयाने अशा समस्यांचा शिकार बनले आहेत. भविष्यात अशा काही समस्या निर्माण झाल्या तर त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही मोहिम महत्वाची ठरणार आहे.

आदित्य एल 1 मिशनद्वारे सूर्यावरील घडामोडी, चुंबकीय वादळे, सूर्याभोवतीच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास, प्लाझ्मा गरम होणे, क्रोमोस्पीयर आणि सौर कोरोना यांचा अभ्यास केला जाणार आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, आदित्य एल-1 ला इच्छित ठिकाणी पोहचण्यास 127 दिवसांचा कालावधी लागणार आहे. भारताची ही पहिलीच सूर्यमोहिम असून 2012 मध्ये ही कल्पना बोलून दाखवली होती. आता ही कल्पना प्रत्यक्षात येत असून ही मोहिम यशस्वी होईल अशी अपेक्षा केली जात आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर आदित्य एल-1 कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT