A video has surfaced from a flight from Delhi to Tbilisi, in this, foreigners are singing the national anthem of India:
भारतात राहणाऱ्या करोडो लोकांचे देशावर प्रेम आहे आणि त्यांच्या मनात त्याबद्दल खूप आदर आहे, ही देशभक्ती आपल्याला अनेक प्रसंगी पाहायला मिळते. विशेषत: जेव्हा राष्ट्रगीत चालू होते तेव्हा प्रत्येकजण आहे त्या स्थितीत उभे राहून त्याचा आदर करतो.
आता असाच एक व्हिडिओ दिल्लीहून तिबिलिसीला जाणाऱ्या विमानातून समोर आला आहे. मात्र, यामध्ये भारतीय नाही तर परदेशी लोक भारताचे राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
इंडिगो फ्लाइटमधून हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक विमानाच्या सीटवर बसून भारताचे राष्ट्रगीत जन-गण-मन म्हणत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा उच्चारही खूप वेगळा आहे.
काही लोक राष्ट्रगीताचा आदर करत जागेवरून उभे राहतानाही दिसतात. भारतातील लोक या व्हिडिओचे खूप कौतुक करत आहेत आणि तो खूप शेअरही केला जात आहे.
वास्तविक, हा व्हिडिओ Newbaneschoir नावाच्या बँडने बनवला आहे. या बँडचे सदस्य विमानात बसले होते आणि त्यांनी एकत्रितपणे भारताचे राष्ट्रगीत गायला सुरुवात केली.
हा बँड अनेक प्रकारच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो, याआधीही त्यांनी इतर देशांच्या गाण्यांवर सादरीकरण केले आहे. मात्र, आता विमानातील या कामगिरीने ते लोकांची मने जिंकत आहेत.
सध्या हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर लाखो लोकांनी पाहिला आहे आणि त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.
काही भारतीयही विमानात बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जन-गण-मन सुरू होताच ते सर्वजण मागे वळून उभे राहतात. काही लोक ते त्यांच्या फोनच्या कॅमेऱ्यात हा प्रसंग रेकॉर्ड करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.