Instagram
InstagramDainik Gomantak

Instagram: इंस्टाग्रामवर फिशिंग स्कॅम टाळण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

आजकाल सायबर गुन्हे वाढले आहेत. कोणतेही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असो काळजी घेणे खुप गरजेचे आहे.
Published on

Instagram how avoid phishing scams on social media app Instagram

डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांचा धोकाही वाढला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणतेही असो, ते सायबर गुन्हेगारांचे टार्गेट राहिले आहे. तुम्ही मेटाचे लोकप्रिय फोटो-व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. इन्स्टाग्रामवर तुमची फसवणूक होणार नाही यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या

  • ऑफरबाबत राहा सतर्क

यूजर्संना आकर्षित करण्यासाठी, स्कॅमर मर्यादित कालावधीच्या ऑफर्स देतात. कोणत्याही प्रकारच्या ऑफरसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळावे.

कोणत्याही प्रकारच्या अज्ञात मॅसेजवर कोणतीही माहिती दिली जात असेल तर तुम्ही व्याकरणातील चूक तपासू शकता. अशा चुका फिशिंग मॅसेजमध्ये होतात.

  • तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स सुरक्षित ठेवा

तुमचे अकाउंट वापरताना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवावे. हे टूल तुमची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करते.

इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड हे अकाउंट लॉग इन करण्याचे साधन आहे. यामुळे चुकूनही तुमचा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.

याशिवाय इंस्टाग्राम अकाउंटच्या सुरक्षिततेसाठी फक्त मजबूत पासवर्ड निवडा.

  • अनोळखी लोकांपासून सावध राहावे

अनोळखी सेंडरपासून कोणत्याही प्रकारचा डायरेक्ट मॅसेज आला तर त्याला लगेच उत्तर देऊ नका.

स्कॅमर यूजर्सची फसवणूक करण्यासाठी बनावट प्रोफाइलचा वापर करतात.

अशावेळी अनोळखी लोकांशी बोलणे टाळावे.

कमेंटमध्ये फ्री फॉलोअर्स, लाईक्स, प्राईज इत्यादी कोणत्याही प्रकारच्या ऑफरला बळी पडू नका.

या ऑफर अनेकदा फिशिंग वेबसाइटशी संबंधित असतात.

  • कोणत्याही संशयास्पद अॅक्टिव्हिटी दिसल्यास तक्रार करा

तुम्हाला एखादे अकाउंट संशयास्पद वाटत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष करू नका. इन्स्टाग्रामवर अशा खात्यांची तक्रार करता येते.

तुम्हाला फिशिंग मेल मिळाल्यास, ते Maitoवर पाठवावे. असे केल्याने, इंस्टाग्राम अशा ईमेलचा मागोवा घेऊ शकते आणि स्कॅमरना थांबवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com