Jammu Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: सुरक्षा दलांना मोठे यश, डोडातून एक दहशतवादी गजाआड

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) डोडा जिल्ह्यात (Doda District) लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) डोडा जिल्ह्यात (Doda District) लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी म्हटले की, ''सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal), राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त शोध पथकाने शनिवारी वाहनांच्या तपासादरम्यान साजन-बजरानी गावातील रहिवासी आदिल इक्बाल बट (Adil Iqbal Butt) याला पकडण्यात यश आले आहे.'' (A Suspected Lashkar e Taiba Terrorist Has Been Arrested In Jammu And Kashmir)

दरम्यान त्यांनी सांगितले की, ''संशयित दहशतवाद्याकडून एक पिस्तूल, दोन मॅगझिन आणि काही गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. मोहम्मद अमीन उर्फ ​​'मुजामिल' उर्फ ​​'हारुन' उर्फ ​​'उमर' हा सध्या पाकिस्तानातून कार्यरत असलेला डोडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.''

श्रीनगर आणि पुलवामामधून दोन दहशतवाद्यांना अटक

त्याचवेळी, शनिवारी देखील खोऱ्यात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवाईत दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली. पुलवामा (Pulwama) आणि श्रीनगरमध्ये (Srinagar) शोधमोहीम राबवण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. दरम्यान एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, गुप्त माहीतीच्या आधारे सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामात शोध मोहीम सुरु केली होती.

शोपियान चकमकीत दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार

या चकमकीत दोन जवानही शहीद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जेव्हा सुरक्षा दल परिसरात शोध मोहीम राबवत होते तेव्हा तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. यादरम्यान गोळीबारात दोन जवानही शहीद झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT