जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा बलांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी जहांगीर नायकू याला अटक केली आहे. ही अटक शोपियांच्या चदूरा बडगाममधून करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या संयुक्त पथकाने गुरुवारी लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) दहशतवादी जहांगीर नायकूला (Jahangir Naiku) अटक केली. (Lashkar e Taiba terrorist Jahangir Nayak arrested by Indian soldiers)
दरम्यान, खोऱ्यात दहशतवादी सातत्याने कारवाया करतच असताना भारतीय जवानांनी केलेली ही मोठी कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. दहशतवाद्यांचा कट उधळण्यासाठी भारतीय जवान सातत्याने मोहीम राबवत आहेत. अलीकडेच, सुरक्षा दलांनी सोपोर आणि बांदीपोरा भागातही मोठे यश मिळाले, ज्यात लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या सहा दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली. या सहा दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
सीआरपीएफच्या बंकरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला
याआधी बुधवारी लष्कराच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी अनंतनागमधील CRPF बंकरवर गोळीबार केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, केपी रोडवर बांधलेल्या सीआरपीएफ बंकरवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. गोळीबाराचा आवाज ऐकून लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी, सुरक्षा दलांनी तत्काळ परिसराला घेरुन शोध मोहीम सुरु केली. केपी रोडवरील एफएम गलीमधील सीआरपीएफ बंकरवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, रविवारी माहिती देताना वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानसाठी काम करणारे लोक काश्मिरी तरुणांना जिहाद करण्यासाठी भडकवत आहेत. काश्मिरी तरुणांना हिंसेचा मार्ग सोडायचा असेल, तर दहशतीचा मार्ग सोडावा लागेल.
शिवाय, महिन्याच्या सुरुवातीला बडगाममधील चकमकीचा तपशील आणि शहजादपुराचा रहिवासी 24 वर्षीय वसीम कादिर मीरच्या फोन कॉल्सचा संदर्भ देत अधिकाऱ्यांनी सांगितले की, तो जानेवारीत मध्य काश्मीरमध्ये त्याला मारलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या क्रूर वागणुकीचा ताजा बळी ठरला. जिल्ह्यातील झोई गावात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
ते पुढे म्हणाले, शोध मोहिमेदरम्यान मीरला दोन पाकिस्तानी साथीदारांनी घेरले होते, त्यानंतर चकमक सुरु झाली. सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.