Crime news Dainik Gomantak
देश

Punjab Crime: पंजाबमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांनी संपवले जीवन; लटकलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

Crime News: आदमपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. पाचही जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले.

Manish Jadhav

Punjab Crime: पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यात मग्न असताना, जालंधरमध्ये एका कुटुंबाने आपले जीवन संपवले. आदमपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. पाचही जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. आर्थिक विवंचनेमुळे या कुटुंबाने एवढे भयंकर पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मनमोहन सिंग (55), त्यांची पत्नी सरबजीत कौर, दोन मुली, 32 वर्षीय प्रभजोत उर्फ ​​ज्योती, 31 वर्षीय गुरप्रीत कौर उर्फ ​​गोपी आणि ज्योती यांची तीन वर्षांची मुलगी अशी मृतांची नावे आहेत. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, मृत 55 वर्षीय मनमोहनने आधी आपल्या कुटुंबातील चार सदस्यांची हत्या केली आणि नंतर गळफास लावून घेतला. आर्थिक विवंचनेतून कुटुंबाने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जालंधर देहाट पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

दुसरीकडे, ही घटना आदमपूरच्या दारौली खुर्द गावात घडली. मृत मनमोहन सिंग यांचे जावई सरबजीत सिंग यांनी सांगितले की, गेल्या दिवसापासून ते त्यांच्या सासऱ्यांना फोन करत होते, मात्र कोणीही फोन उचलला नाही. रविवारी सायंकाळी उशिरा ते स्वत: दारौली खुर्द येथे पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. एका निष्पाप मुलीसह कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. याची माहिती मिळताच आदमपूर पोलीस ठाण्याचे एस.एच.ओ. मनजीत सिंग घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरुन एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे.

दुसरीकडे, मनमोहन सिंग पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचे. एसएचओ मनजीत सिंग यांनी सांगितले की, मनमोहन सिंग यांनी सुसाईड नोटमध्ये 2003 मध्ये पोल्ट्री फार्म सुरु करण्यासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे लिहिले आहे. व्यवसायात नुकसान झाल्यानंतर त्यांनी गावातील सावकाराकडून व्याजावर जास्त पैसे घेतले. व्याज भरुन ते आणखी कर्जात बुडाले. कुटुंब आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल कोणालाही त्रास होऊ नये. मृताच्या मानेवर दोरीच्या खुणा आहेत. सर्वांना फाशी दिल्यानंतर मनमोहन सिंग यांनी आत्महत्या केली असावी, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपासासाठी फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT