Punjab: पंजाबमधील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात, 19 महिन्यांत 272 जणांचा मृत्यू; NCRB ची धक्कादायक आकडेवारी

NCRB: अंमली पदार्थांबाबत सरकार वेगवेगळे दावे करत आहे, पण सत्य हेच आहे की, राज्यातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात आहे.
Drugs
Drugs Dainik Gomantak
Published on
Updated on

Punjab: पंजाबमध्ये व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अंमली पदार्थांबाबत सरकार वेगवेगळे दावे करत आहे, पण सत्य हेच आहे की, राज्यातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात आहे.

राज्यात दर दुसऱ्या दिवशी सरासरी एक मृत्यू नशेमुळे होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीवरुन पंजाबमध्ये गेल्या 19 महिन्यांत ड्रग्जमुळे 272 लोकांचा मृत्यू झाला आहे, ही परिस्थिती किती धोकादायक बनली आहे, याचा अंदाज यावरुन येतो.

NCRB च्या अहवालानुसार, पंजाबमध्ये 2017 ते 2021 या चार वर्षांत ड्रग्जमुळे 272 लोकांचा मृत्यू झाला. यानंतर पुन्हा 19 महिन्यांत 272 तरुणांना जीव गमवावा लागला.

मृत्यूची ही आकडेवारी रुग्णालयांनी (Hospital) उपलब्ध करुन दिली आहे, तर ज्या लोकांचा घरी मृत्यू झाला असेल किंवा काही कारणास्तव रुग्णालयात पोहोचू शकले नाहीत अशा लोकांबद्दल कोणतीही माहिती नाही.

अंमली पदार्थांच्या व्यसनाने राज्यातील तरुणांना अशाप्रकारे गुरफटले आहे की, आजही राज्यातील 25 लाखांहून अधिक लोक त्याच्या विळख्यात आहेत.

Drugs
Punjab and Haryana High Court: "महिलेच्या आत्महत्येस सासरचेच जबाबदार असतील असे नाही"; आरोपींना मुक्त करत, कोर्ट म्हणाले...

अहवालानुसार, पंजाबमधील (Punjab) मोगा, फिरोजपूर, लुधियाना आणि भटिंडा या चार जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. 2022 आणि 2023 मध्ये या चार जिल्ह्यांमध्ये 235 जणांना नशेमुळे जीव गमवावा लागला आहे.

आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, 2022 मध्ये मोगा, फिरोजपूर आणि भटिंडा येथे अनुक्रमे 37, 35, 22 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 2023 मध्ये अनुक्रमे 10, 21, 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तीन जिल्ह्यांची आश्चर्यकारक आकडेवारी

याशिवाय, इतर सर्व जिल्ह्यांमध्ये मृतांचा आकडा 10 पेक्षा जास्त नाही. म्हणजे वरील तीन जिल्ह्यांच्या तुलनेत येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 7 वर्षात अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे एकूण 544 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या पंजाबचा माळवा प्रदेश ड्रग्जचा अड्डा बनत चालला आहे. गेल्या 19 महिन्यांतील एकूण मृत्यूंपैकी 222 एकट्या या भागातील आहेत.

Drugs
Punjab And Haryana High Court: अमृतपाल सिंग प्रकरणी न्यायालय सक्त, '80 हजार पोलिस असताना...

सर्वाधिक मृत्यू 18 ते 30 वयोगटातील आहेत

अहवालानुसार, पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये 18 ते 30 वयोगटातील तरुणांचा समावेश आहे.

2017 ते 2021 या कालावधीत राज्यात नशेमुळे झालेल्या 272 मृत्यूंपैकी 122 जणांचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान होते. 59 लोक ज्यांचे वय 30-40 वर्षे होते, 8 लोक 45-60 वर्षे होते, 2 लोक 60 वर्षांपेक्षा जास्त होते. तथापि, 14 ते 18 वर्षे वयोगटातील अशा 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com