Punjab Crime: आधी पत्नीची हत्या, नंतर स्वत:वर गोळी झाडली; लष्करी अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

वैवाहिक कलहामुळे त्यांचे नियमित समुपदेशन सुरू होते.
Punjab Crime
Punjab CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Punjab Crime: पंजाबमध्ये लष्कराच्या एका लेफ्टनंट कर्नलने पत्नीची हत्या करून स्वत:वर गोळी झाडली. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अधिकारी पंजाबमधील फिरोजपूर येथे राहत होते.

या लष्करी अधिकाऱ्याने एक सुसाइड नोट देखील लिहली आहे. ज्यामध्ये त्यांनी पत्नीवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. त्यांची पत्नी राहत्या घरी मृतावस्थेत आढळली आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वैवाहिक कलहामुळे त्यांचे नियमित समुपदेशन सुरू होते. लष्कर आणि पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Punjab Crime
India Vs China: ड्रॅगनचे मनसुबे उधळून लावण्याची तयारी, पाकसाठीही धोक्याची घंटा; आता ड्रोन...

रविवारी रात्री 09 वाजण्याच्या सुमारास लष्करी अधिकाऱ्याने पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर तो युनिटच्या क्वार्टर गार्डमध्ये गेला, तेथील एका मंदिरात प्रार्थना केली आणि स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली.

लष्कराच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी आरोपी अधिकाऱ्याच्या घरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणीतरी फोनलाही उत्तर दिले नाही, म्हणून घरी गेलेल्या अधिकाऱ्यांना त्यांची पत्नी मृतावस्थेत आढळली.

Punjab Crime
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या विरोधात का उतरले पुजारी, 'भारत हा पुरोहितांचा देश नसून...'

या अधिकाऱ्याने एक सुसाईड नोट देखील लिहली आहे. यात वैवाहिक वादातून आपल्या पत्नीला गोळी मारल्याची त्यांनी कबुली दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हे लष्करी अधिकारी हिमाचल प्रदेशचे रहिवासी होते तर त्यांची पत्नी शेजारच्या उत्तराखंड राज्यातील डेहराडूनच्या होत्या. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी फिरोजपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अधिकारी आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com