Madhya Pradesh Dainik Gomantak
देश

दोन गटांत वाद! रामनवमीला रॅलीदरम्यान 4 राज्यांमध्ये संघर्ष, गुजरातमध्ये 1 ठार

दैनिक गोमन्तक

रविवारी हिंदूंच्या रामनवमीच्या सणानिमित्त गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात जातीय संघर्ष उफाळून आला. गुजरातमध्ये खंभात शहरात रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आणि त्या दरम्यान एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन शहरात रामनवमीच्या मिरवणुकीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर गुन्हेगारांवर कलम 144 लागू करण्यात आले. झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागातही अशीच चकमक झाल्याचे चित्र आहे. (A dispute between the two groups Clashes in 4 states during Ram Navami rally 1 killed in Gujarat)

गुजरात

गुजरातच्या खंभातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. तसेच काही दुकानांना आग देखील लावण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी फायरब्रिगेडचा वापर केला.

पोलीस अधीक्षक अजित राज्यन यांनी सांगितले की, "खंभात येथील घटनास्थळावरून सुमारे 65 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला, जिथे दुपारी उशिरा रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान त्यांच्यात झालेल्या चकमकीनंतर दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. हिम्मतनगरमध्ये दोन समाजाच्या सदस्यांमध्ये हाणामारी होऊन वाहनं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं.

"रामनवमीच्या मिरवणुकीवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली तर त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. या धुमश्चक्रीदरम्यान काही जणांना दगडांचा मार लागला, पण काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली,"अशी माहिती साबरकांठाचे पोलीस अधीक्षक विशाल वाघेला यांनी दिली आहे. या भागात अतिरिक्त सुरक्षा दल देखील तैनात करण्यात आले होते.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये रामनवमीच्या मिरवणुकी दरम्यान दगडफेक करण्यात आली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अशी माहिती खरगोनचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुमेरसिंग मुजलदे यांनी दिली आहे.

दगडफेकीमुळे जाळपोळ आणि काही वाहने तसेच घरे जाळून खाक झाली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या चकमकीत जखमी झालेल्यांमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

या घटनेनंतर रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री संपूर्ण खरगोन शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वगळता नागरिकांना बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालच्या (West Bengal) हावडा येथील रामनवमीच्या मिरवणुकीवर रविवारी हल्ला झाला. या घटनेचा पोलीस तपास सुरू करण्यात आला असून सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

रामनवमीच्या मिरवणुकीवर पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने (BJP) केला. या घटनेची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करताना पोलिसांनी हावडामधील रहिवाशांना संयम बाळगण्याचा इशारा दिला आहे.

झारखंड

झारखंडच्या बोकारोमध्ये काही तरुण बाईकवरुन रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जात असताना एका गटाशी त्यांचं भांडण झालं आणि त्यांनी त्यांच्यावर दगडांनी हल्ला केला, असा आरोप केला आहे. पोलिसांनी सांगितले की, तर हे प्रकरण मिटविण्यात आले आणि शांतता पुनर्संचयित झाली.

लोहरदगामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले असून दहा मोटारसायकली तसेच पिकअप व्हॅन जळून खाक झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका समुदायाच्या लोकांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर दगडफेक केली होती. त्यानंतर हल्ला करणाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती तणावपूर्ण असून, या संघर्षात सहभागी असलेल्यांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT