झारखंड: झारखंडमधील देवघर येथे त्रिकुट रोपवे अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आठ जणांवर देवघर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ताज्या माहितीनुसार, 12 ट्रॉलीमध्ये एकूण 48 लोक अजूनही अडकले आहेत. (Death of two women in Serious ropeway accident at Deoghar)
त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या (Helicopter) मदतीने बचावकार्य सुरू आहे. खासदार निशिकांत दुबे यांनीही त्रिकूट रोपवेवर पोहोचून रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांची माहिती घेतली.
ड्रोनच्या माध्यमातून लोकांपर्यंत मदत साहित्य पोहोचवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. रोपवे अपघातात (Accident) अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. मदतकार्यात पहाटे पाच वाजल्यापासून हेलिकॉप्टरद्वारे रेकी करण्यात येत आहे. देवघरमध्ये असूनही झारखंडचे पर्यटन मंत्री हाफिझुल हसन अद्याप त्रिकुटला पोहोचलेले नाहीत.
त्रिकुट येथील या घटनेत केबिनमध्ये अडकलेल्या अनेकांना दुखापत झाल्याचेही वृत्त आहे. वरच्या मजल्यावरील केबिनमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत मदत साहित्य पोहोचवता आले नाही, तरीही उतरत्या केबिनमधील प्रत्येकापर्यंत मदत साहित्य पोहोचवण्याचे सांगण्यात आले. भारतीय हवाई दलाचे जवान हेलिकॉप्टरच्या साह्याने त्यांना वाचवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.