Madhya Pradesh ANI
देश

MP Video: 'त्या' 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; 55 फूट खोल बोअरवेलमध्ये चार दिवसांपासून पडला होता अडकून

शेतात खेळत असताना तो बोअरवेलमध्ये पडला होता.

Pramod Yadav

Madhya Pradesh: मध्यप्रदेश राज्यातील बेतुल जिल्ह्यात आठ वर्षीय मुलगा 55 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकून पडला. मांडवी गावात मंगळवारी (दि.05) सायंकाळी ही घटना घडली होती. मुलाला बाहेर काढण्याचे प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न मागील चार दिवसांपासून सुरू होते. चार दिवसांनंतर या मुलाला बाहेर काढण्यात आले व तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. तन्मय साहू असे या आठ वर्षीय मुलाचे नाव असून, शेतात खेळत असताना तो बोअरवेलमध्ये पडला होता.

(8-year-old Tanmay Sahu Dies who fell into a borewell in Betul, Madhya Pradesh on 6th December)

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहन हे देखील या सर्व घडामोडीकडे लक्ष ठेवून होते. तन्मयचा मृत्यू झाल्याने त्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, तन्मयच्या कुटुंबियांना चार लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तन्मयचे आई-वडील आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण मध्यप्रदेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो 400 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. शेतात खेळत असताना तन्मय खेळत खेळत दुसऱ्या शेतात गेला आणि त्याठिकाणी खुल्या असलेल्या बोअरमध्ये पडला. मुलगा 55 फूट खोल आत असून, त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. जेसीबीच्या मदतीने खड्डा काढून अखेर त्याला बाहेर काढण्यात आले मात्र, तो मृत झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT