Bihar Crime Dainik Gomantak
देश

Bihar Crime: बिहारमध्ये गुंडाराज! कर्जाच्या बदल्यात 11 वर्षीय मुलीशी सावकारानं केलं जबरदस्तीनं लग्न

Bihar Crime: बिहारमधील सिवान येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

Bihar Crime: बिहारमधील सिवान येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कर्जाची परतफेड न केल्याने एका व्यक्तीने 11 वर्षाच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलीच्या आईने कर्ज घेतले होते. पैसे न दिल्याने त्या व्यक्तीने हे घृणास्पद कृत्य केले. या घटनेबाबत विचारणा केली असता पोलीस (Police) आणि प्रशासनानेही मौन बाळगले.

दरम्यान, ही घटना सिवानमधील मैरवा भागातील असल्याची माहिती आहे. मैरवा येथील रहिवासी असलेल्या या महिलेने लक्ष्मीपूर गावातील रहिवासी महेंद्र पांडे यांच्याकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

महेंद्र पांडे यांचे वय 40 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. महेंद्रने महिलेला कर्जाचे पैसे परत करण्यास सांगितले असता ती परत करु शकली नाही. त्यानंतर आरोपीने (Accused) तिच्या 11 वर्षाच्या मुलीशी लग्न केले. मुलगी सध्या महेंद्र पांडे यांच्या घरी राहत आहे.

दुसरीकडे, अल्पवयीन मुलीच्या आईने सांगितले की, तिचे लक्ष्मीपूर गावात नातेवाईक आहेत. नातेवाईकांना भेटण्यासाठी ती आपल्या मुलीसोबत ये-जा करत असे.

आईने पुढे सांगितले की, गावातील महेंद्र पांडे याने मुलीला शिकवणार असल्याचे सांगितले. शिकवण्याच्या नावाखाली त्याने मुलीला आपल्या सोबत ठेवले. आपल्या मुलीने महेंद्र पांडेच्या तावडीतून सुटका करुन घ्यावी अशी तिची इच्छा आहे.

तर, आरोपी महेंद्र पांडेबाबत बोलताना ती महिला स्पष्टपणे बोलत नाही. आपल्याकडून चूक झाली असून आपण शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे ती म्हणते. त्याने आपल्या मुलीला ठेवून घेतले आहे, ती कुठेच जाऊ शकत नाही, असेही ती सांगते.

तसेच, पीडित अल्पवयीन मुलीला विचारले असता तिने सांगितले की, आईने महेंद्र पांडे यांच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जात किती रक्कम घेतली हे कळू शकलेले नाही. पांडे यांनी कर्ज परत करण्यास सांगितल्यावर आईने मुलीला त्याच्या घरी सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

SCROLL FOR NEXT