Madhya Pradesh: दोन्ही हात तोडून बापानेच केली 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, विचित्र कारण आले समोर

पोलिसांनी आरोपी वडील आणि महिलेला अटक केली आहे.
Madhya Pradesh
Madhya PradeshDainik Gomantak

मध्यप्रेदश राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या पोटच्या 15 वर्षीय मुलाचे दोन्ही हात तोडून त्याची निर्घृण हत्या केली. देवास जिल्ह्यातील बरोठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वडिलांना एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यावरूनच, दोन्ही हात कापून त्यानंतर गळा आवळून त्याचा खून केला. पोलिसांनी आरोपी वडील आणि महिलेला अटक केली आहे.

Madhya Pradesh
PM Modi Viral Video: पंतप्रधान मोदींना नाही आवरला ढोल वाजवण्याचा मोह, पाहा व्हिडिओ

देवासचे एसपी शिवदयाल सिंह यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, बांगर्डा गावात 6 डिसेंबर रोजी एक मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या पथकाला झुडपात एक विव्रस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला. मृतदेहाचे दोन्ही हात कोपरापासून तोडण्यात आले होते. तपासादरम्यान एका दिवसापूर्वीच तरुणाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. हरिओम चौहान (15) असे या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी मुलाच्या वडीलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा मान्य केला आहे.

Madhya Pradesh
PM Modi Goa Visit: मोदींच्या दौऱ्यापूर्वी रातोरात बदलले लेन सेपरेटर, वेली झुडपांनी वेढलेला भागही झाला स्वच्छ

हरिओम चौहान हा आठवीच्या वर्गात, गावातील सरकारी शाळेत शिकत होता. तो एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहीणही आहे. आरोपी वडील शेतकरी असून ते देखील मजुरी करायचे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com