Saurabh Bhardwaj And Atishi Singh Dainik Gomantak
देश

Delhi Politics: सौरभ भारद्वाज अन् आतिशी सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Delhi Government: दिल्ली सरकारच्या 2 नवीन मंत्र्यांनी आज शपथ घेतली. सौरभ भारद्वाज आणि आतिशी सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Manish Jadhav

Saurabh Bhardwaj And Atishi Singh: दिल्ली सरकारच्या 2 नवीन मंत्र्यांनी आज शपथ घेतली. सौरभ भारद्वाज आणि आतिशी सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सौरभ भारद्वाज यांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे, तर आतिशी सिंह पहिल्यांदाच मंत्रिमंडळात सामील झाल्या आहेत.

सौरभ यांची प्रोफाइल?

सौरभ भारद्वाज केजरीवाल-1 मंत्रिमंडळात परिवहन मंत्री होते आणि सध्या ते दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत. दिल्लीतील (Delhi) ग्रेटर कैलासमधून ते तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी संगणक शास्त्रात अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.

यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनही काम केले. सौरभ यांनी उस्मानिया विद्यापीठातून एलएलबीचेही शिक्षण घेतले आहे. सत्येंद्र जैन तुरुंगात गेल्यानंतर हे पद रिक्त असल्याने त्यांना आरोग्य खाते दिले जाऊ शकते, अशी चर्चा यापूर्वीच होती.

सत्येंद्र जैन यांना मे 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. ईडीने त्याला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

कोण आहे आतिशी सिंह?

आतिशी सिंह कालकाजी मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) आमदार आहेत. त्या शिक्षण मंत्रालयात सिसोदिया यांच्या माजी सल्लागार होत्या.

दिल्लीतील शाळांमध्ये बदल घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनीच दिल्लीत हॅपीनेस स्कूल सुरु केले.

आतिशीने सेंट स्टीफन कॉलेजमधून बॅचलरची पदवी घेतली आहे. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांना प्रथमच दिल्ली मंत्रिमंडळात स्थान मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT