accident Dainik Gomantak
देश

Army Bus Accident: सिक्कीममध्ये भीषण अपघात, लष्कराचे 16 जवान शहीद

Indian Army vehicle accident in North Sikkim: सिक्कीममधील जेमा येथे झालेल्या रस्ते अपघातात लष्कराचे 16 जवान शहीद झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Indian Army Vehicle Accident In North Sikkim: सिक्कीममधील जेमा येथे झालेल्या रस्ते अपघातात लष्कराचे 16 जवान शहीद झाले आहेत. तीव्र वळणावरुन जात असताना लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले, त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जवानही जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, 23 डिसेंबर 2022 रोजी उत्तर सिक्कीममधील जेमा येथे लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले. या भीषण रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे.

लष्कराने सांगितले की, अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा भाग होते, जे सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. जेमाच्या वाटेवर एका तीव्र वळणावर वाहन घसरले. अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरु करण्यात आली आणि चार जखमी जवानांना विमानाने उपचारासाठी हलवण्यात आले. दुर्दैवाने, या दुर्घटनेत तीन कनिष्ठ अधिकारी आणि 16 सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर (Indian Army) शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे.

3 जेसीओसह 16 जवान शहीद झाले

या दुर्घटनेत दुर्दैवाने तीन कनिष्ठ अधिकारी आणि 16 जवान शहीद झाल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे. उत्तर सिक्कीम (Sikkim) हा अतिशय धोकादायक भाग आहे. हा भाग पूर्णपणे बर्फाच्छादित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT