Sikkim: भारतीय लष्कर आणि चीनी पीएलए दरम्यान हॉटलाइनची स्थापना

हा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2021 रोजी पीएलए दिवसानिमित्त झाला. दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये ग्राउंड कमांडरच्या स्तरावर संपर्क यंत्रणा सुस्थापित करण्यात आली आहे.
Sikkim
SikkimDainik Gomantak
Published on
Updated on

सीमेवर विश्वास आणि शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी उत्तर सिक्कीममधील (Sikkim) भारतीय लष्कर (Indian Army) आणि तिबेट स्वायत्त प्रदेशातील खंबा झोंग यांच्यात हॉटलाईनची स्थापना (Establishment of Hotline) करण्यात आली. हा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2021 रोजी पीएलए दिवसानिमित्त झाला. दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये ग्राउंड कमांडरच्या स्तरावर संपर्क यंत्रणा सुस्थापित करण्यात आली आहे. ही हॉटलाईन विविध क्षेत्रांमध्ये दळणवळण वाढवण्यासाठी आणि सीमेवर शांतता राखण्यासाठी मदत करेल. उद्घाटनाला संबंधित सैन्याचे ग्राउंड कमांडर उपस्थित होते आणि हॉटलाइनद्वारे मैत्री आणि सदिच्छा संदेशांची देवाणघेवाण केली गेली.

Sikkim
India - China: चीन तिबेटमधून रचत आहे भारताविरुद्ध षडयंत्र

न्यिंगची चा दौरा

अलीकडेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण तिबेट सीमावर्ती न्यिंगची शहराला भेट दिली आहे. शी जिनपिंग तिबेटला भेट देणारे पहिले चिनी राष्ट्राध्यक्ष आहेत. या दरम्यान त्यांनी नवीन आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाचा आढावा घेतला. 23 मे, 1951 रोजी चीन आणि तिबेट यांनी सतरा कलमी करारावर स्वाक्षरी केली. चीनने या कराराचे वर्णन "तिबेटची शांततापूर्ण मुक्ती" असे केले आहे. मात्र हा करार दलाई लामांनी फेटाळला आहे. ते म्हणतात की कम्युनिस्ट पक्ष आणि चीनने हा करार तिबेटवर लादला आणि नंतर त्यांच्या वचनबद्धतेचे उल्लंघन केले. यामुळे अखेरीस ते 1959 मध्ये निर्वासनात भारतात पळून गेले.

Sikkim
अफगाणिस्तानमध्ये चीनची एंट्री ? China करणार तालिबानला मदत

पंतप्रधानांनी दलाई लामांना त्यांच्या 86 व्या वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama) यांनी 6 जुलै रोजी त्यांचा 86 वा वाढदिवस साजरा केला. जागतिक नेते आणि हितचिंतकांकडून शुभेच्छा मिळाल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटले की, "आम्ही आज दलाई लामा यांच्या 86 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फोनवर बोललो. आम्ही त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची कामना करतो.” अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सिक्कीमचे प्रेमसिंग तमांग हे दलाई लामांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. दोन्ही राज्यांची सीमा चीनला लागून आहे आणि चीन या दोन राज्यांवर दावाही करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com