Manish Sisodia Dainik Gomantak
देश

मनीष सिसोदियासह 13 जणांना देश सोडण्यास बंदी, CBIने जारी केली लुक आऊट नोटीस

अबकारी धोरणावरून वादात सापडलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 13 जणांना देशाबाहेर जाण्यवर बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

अबकारी धोरणावरून वादात सापडलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासह 13 जणांना देशाबाहेर जाण्यवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सीबीआयने या सर्वांना लुक आऊट नोटीस जारी केली आहे. शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या पथकाने मनीष सिसोदिया यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने छापेमारीत कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त केले आहेत, त्या संबधात चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई देखील केली जाणार आहे. (13 people including Manish Sisodia barred from leaving the country CBI issues look out notice)

येथे सीबीआयच्या कारवाईनंतर मनीष सिसोदिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटले की, "भाजप आणि सीबीआयच्या छाप्यांबाबत मोदीजींचे हे विधान तुम्ही जरूर ऐका. तुम्ही ऐकले नाही, तर तुम्हाला खूप मोठे सत्य जाणून घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे."

त्याचवेळी त्यांनी पीएम मोदींचा जुना व्हिडिओ शेअर करताना त्यांना टोमणा मारला. त्यांनी लिहिले की, "हळूहळू ऋतू बदलत राहतात, वाऱ्यांनाही तुमचा वेग पाहून आश्चर्य वाटते, सर." सिसोदिया यांच्या निकटवर्तीयाच्या कंपनीला कथितपणे 1 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला, तर सिसोदिया म्हणाले की त्यांनी काहीही चुकीचे केले नाही आणि सीबीआय तपास आणि छापे यांना घाबरत देखील नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

SCROLL FOR NEXT