6 राज्ये, 41 मृत्यू; हिमाचल प्रदेशपासून उत्तर प्रदेशपर्यंत पावसाचा आक्रोश

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि उत्तर प्रदेशात 24 तासामध्ये मुसळधार पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे.
Monsoon Update
Monsoon Update Dainik Gomantak
Published on
Updated on

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि उत्तर प्रदेशात 24 तासामध्ये मुसळधार पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि ढगफुटीमुळे 22 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, उत्तराखंडमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण बेपत्ता आहेत. झारखंडमध्ये पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला, तर सात जण नद्यांच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशात तीन जणांचा मृत्यू झाला तर हा आकडा जम्मू-काश्मीरमध्ये 2 आणि ओडिशामध्ये 6 आहे. (6 states 41 deaths From Himachal Pradesh to Uttar Pradesh the rains are lashing)

Monsoon Update
Congress: कोण होणार काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष? राहुल गांधींचा अध्यक्षपदासाठी नकार

कांगडा जिल्ह्यात रेल्वे सेवा ठप्प हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी शनिवारी सांगितले की, मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. तसेच अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

मंडी जिल्ह्यातील संततधार पावसामुळे शनिवारी शाळा देखील बंद होत्या. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच हमीरपूरमध्ये पुरानंतर अडकलेल्या 22 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कांगडा जिल्ह्यात सकाळी चक्की पूल कोसळल्यानंतर जोगिंदर नगर ते पठाणकोट मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती.

ओडिशाच्याउत्तर भागामध्ये पुराचा धोका महानदीच्या काठावरील पुराच्या तडाख्याने राज्य आधीच होरपळून निघत होते. तसेच 500 गावांमध्ये सुमारे चार लाख लोक अडकले आहेत. ओडिशा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता बीके मिश्रा यांनी शनिवारी सांगितले की, बालासोर, केओंझार आणि मयूरभंजमध्ये शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस पडला. त्यानंतर सुवर्णरेखा, बुद्धबलंग, वैतरणी, साळंदी या भागात पाण्याच्या पातळीचे परीक्षण केले जात आहे तसेच राज्यात पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com