Tablet On Cancer Dainik Gomantak
देश

Tata Memorial Hospital: 100 रुपयांची टॅब्लेट रोखणार दुसऱ्यांदा होणारा कर्करोग, टाटा मेमोरियलच्या डॉक्टरांची किमया

Tablet On Cancer: या संशोधनासाठी उंदरांमध्ये मानवी कर्करोगाच्या पेशी टाकण्यात आल्या, त्यानंतर त्यांच्यामध्ये ट्यूमर तयार झाला, त्यानंतर त्यांच्यावर रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि सर्जरीद्वारे उपचार करण्यात आले.

Ashutosh Masgaunde

Tablet, for preventing second time cancer:

कर्करोग झालेले जवळपास निम्म्या रुग्णांना मृत्यूचा धोका असतो. यशस्वी उपचारानंतरही पुन्हा कर्करोग विळखा टाकतो. पण सर्वात मोठ्या कॅन्सर हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यावर उपाय शोधला आहे.

टाटा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एक टॅब्लेट तयार केली आहे, ज्यामुळे दुसऱ्यांदा कर्करोग होण्यापासून बचाव होईल आणि केमो-रेडिएशनचे दुष्परिणाम देखील कमी होतील.

मुंबईचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, भारतातील सर्वात मोठे आणि सर्वोत्कृष्ट कर्करोग रुग्णालय, नेहमीच रुग्णांनी भरलेले असते.

भारतात कॅन्सरची वाढती प्रकरणे पाहता, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी एक टॅब्लेट विकसित केली आहे जी कर्करोगावर उपचार करण्यासाठी आणि कर्करोग दुसऱ्यांचा होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते.

या संशोधनासाठी उंदरांमध्ये मानवी कर्करोगाच्या पेशी टाकण्यात आल्या, त्यानंतर त्यांच्यामध्ये ट्यूमर तयार झाला, त्यानंतर त्यांच्यावर रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि सर्जरीद्वारे उपचार करण्यात आले.

यामध्ये असे आढळून आले की जेव्हा कर्करोगाच्या पेशी मरतात, तेव्हा त्या खूप लहान तुकड्यांमध्ये मोडतात, या तुकड्यांना क्रोमॅटिन कण म्हणतात.

क्रोमॅटिनचे कण रक्तप्रवाहातून शरीराच्या इतर भागात जाऊ शकतात आणि जेव्हा ते निरोगी पेशींमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते कर्करोगाच्या पेशींमध्ये बदलू शकतात, ज्यामुळे कर्करोग नष्ट झाल्यानंतरही परत होण्याचा धोका असतो.

या समस्येवर उपाय शोधण्यासाठी डॉक्टरांनी उंदरांना रेझवेराट्रोल आणि कॉपरच्या एकत्रित प्रो-ऑक्सिडंट गोळ्या दिल्या. क्रोमॅटिन कणांचा प्रभाव रोखण्यासाठी या गोळ्या फायदेशीर ठरल्या.

टाटा मेमोरियलचे डॉक्टर जवळपास दशकभर या टॅब्लेटवर काम करत होते आणि अखेर त्यांना यश मिळाले. सध्या, टॅबलेट अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

2022 मध्ये भारतात कर्करोगाच्या रुग्णांची अंदाजे संख्या 14,61,427 होती. तर 2018 ते 2022 पर्यंत 8,08,558 लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला.

ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, गर्भाशय आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे भारतात नोंदवली जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सध्या जगभरातील कर्करोगाचे २० टक्के रुग्ण भारतात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT