Job Of Rat Exterminator In US: अमेरिकेत उंदीर मारण्यासाठी तब्बल 1 कोटी 30 लाख रूपये पगाराची ऑफर

रिक्त जागेसाठी जाहीरात, बुद्धिमान व्यक्तीची गरज असल्याचे पात्रतेत नमूद
US Rat Exterminator
US Rat ExterminatorDainik Gomantak

Job Of Rat Exterminator In US: जर तुम्ही परदेशात नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क (New York, USA) या शहरातील एक नोकरी सध्या चर्चेत आहे. या सरकारी नोकरीत तुम्हाला फार काही करायचे नाही, फक्त उंदीर पकडून मारायचे आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी 97.7 लाख रूपये ते 1.3 कोटी रूपये पगार दिला जाणार आहे.

US Rat Exterminator
America: अमेरिकेने केली धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांची यादी जाहीर

न्यूयॉर्क शहराच्या महापौर प्रशासनाने गेल्या बुधवारी या नोकरीची जाहीरात दिली आहे. विशेष म्हणजे न्यूयॉर्क शहरात Director of Rodent Migration बनण्यासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. या जॉबसाठी दिलेल्या जाहीरातीत म्हटले आहे की, खऱ्या शत्रुशी लढण्याची हिंमत असलेली व्यक्ती हवी आहे. न्यूयॉर्क शहरातील उंदीर बुद्धिमान आहेत. त्यांचा मेंदू हुशार आहे. त्यामुळे त्यांच्याशी सामना करायचा असेल तर कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तीची गरज आहे.

न्यूयॉर्कमध्ये रोडंट रिमुव्हरची (Rodent Remover) गरज आहे. शहरात गेल्या 8 महिन्यात उंदिरांच्या त्रासांमुळे होणाऱ्या तक्रारीत 70 टक्के वाढ झाली आहे. हे प्रमाण गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक आहे. उंदरांच्या समस्येपासून सुटकेसाठी नवे कायदेही लागू करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ रात्री 8 नंतर कुणीही घराबाहेर कचरा ठेऊ नये. असे केल्यास जबर दंड केला जाईल.

US Rat Exterminator
Baba Vanga: अत्यंत धोकादायक असेल 2023 वर्ष, बाबा वेंगाची भविष्यवाणी

गेल्याच महिन्यात न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी याबाबत इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, मला उंदीर आवडत नाहीत. आणि आम्ही उंदरांना मारणार आहोत. उंदरांच्या समस्येपासून लवकरात लवकर सुटका करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

2014 मधील एका अभ्यासानुसार न्यूयॉर्कमध्ये माणसांपेक्षा जास्त उंदीर आहेत. सध्यस्थितीत न्यूयॉर्कमध्ये 1.8 कोटी हून अधिक उंदीर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com