Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

Pakistan Factory Blast: पूर्व पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील फैसलाबाद शहरात एका औद्योगिक प्रकल्पात मोठा आणि भीषण स्फोट झाला.
Pakistan Factory Blast
Pakistan Factory BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Factory Blast: पूर्व पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील फैसलाबाद शहरात एका औद्योगिक प्रकल्पात मोठा आणि भीषण स्फोट झाला. येथील एका गोंद (Glue) बनवण्याच्या फॅक्टरीत शुक्रवारी (21 नोव्हेंबर) सकाळी बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत कमीतकमी 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर सातहून अधिक मजूर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अग्निशमन दलासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

व्यवस्थापक अटकेत, मालक फरार

दरम्यान, या भीषण स्फोटानंतर फॅक्टरीचा मालक तातडीने घटनास्थळावरुन फरार झाला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फॅक्टरीच्या व्यवस्थापकाला अटक केली, तर फरार मालकाचा शोध घेत आहेत. स्थानिक पोलीस अधिकारी मोहम्मद अस्लम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.

Pakistan Factory Blast
Pakistan Supreme Court Blast: पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा धमाका! 12 जण गंभीर जखमी; स्फोटाचे नेमके कारण काय? VIDEO

मोठी हानी आणि भीतीचे वातावरण

फैसलाबाद शहरात झालेल्या या औद्योगिक स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासक राजा जहांगीर यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, बॉयलरचा स्फोट इतका तीव्र होता की, या स्फोटामुळे केवळ फॅक्टरीच्या इमारतीचेच नव्हे, तर आसपासच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्फोटानंतर फॅक्टरीमध्ये त्वरित मोठी आग लागली, ज्यामुळे जीवित व वित्तहानी वाढली. एवढ्या मोठ्या दुर्घटनेमुळे या औद्योगिक परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले.

Pakistan Factory Blast
Suicide Attack In Pakistan: पाकिस्तानी सैन्याच्या चेकपोस्टला पुन्हा बनवले निशाणा! आत्मघाती हल्ल्यात 20 सैनिक मारल्याचा दावा, धडकी भरणारा VIDEO व्हायरल

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या संवेदना

पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांनी या दुःखद घटनेबद्दल संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री शरीफ यांनी अधिकाऱ्यांना जखमी मजुरांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. तसेच, या अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

Pakistan Factory Blast
India Pakistan Conflict: "पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

सुरक्षेचे खराब मानक हेच प्रमुख कारण

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात औद्योगिक अपघात आणि फॅक्टरीतील आगीच्या घटना वारंवार घडतात, याचे एक मोठे कारण म्हणजे सुरक्षेचे अत्यंत खराब मानक. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे असे मोठे अपघात घडत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. अलीकडेच 2024 मध्ये फैसलाबाद येथील एका कापड गिरणीत अशाच प्रकारचा बॉयलर स्फोट झाला होता, ज्यात सुमारे एक डझन मजूर जखमी झाले होते. गेल्या आठवड्यात कराची शहरात एका फटाका फॅक्टरीत झालेल्या स्फोटातही चार लोकांचा मृत्यू झाला.

या प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पाकिस्तानमधील औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, या गोंद फॅक्टरी स्फोटाच्या सखोल चौकशीनंतर सुरक्षेच्या मानकांवर लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com