Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

नको वर्गाच्या भिंती

दैनिक गोमन्तक

वर्गाच्या चार भिंतींबाहेर’ वगैरे विषयावर कार्यशाळा क्वचितच घडतात आणि शाळाही अशी एखादी कार्यशाळा घ्यायला क्वचितच धजावते. ‘अभ्यासक्रम’ आणि ‘परीक्षा’ या दोन व्यूहांच्या फेऱ्यात विद्यार्थी आणि शिक्षकही वर्षनेम परंपरेने इतके अडकलेले असतात की 'Life Is Elsewhere" या वास्तवतेची जाणीवही त्या व्यस्त बधीरतेमुळे अनेक वेळा त्यांच्या लक्षात येत नाही.

वेर्णा येथील ‘महालसा नारायणी हायस्कूल’ने आपल्या शिक्षकांसाठी आवर्जून ‘वर्गाच्या चार भिंतींबाहेर’ विषयावरची कार्यशाळा आयोजित केली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार्यशाळेचे प्रशिक्षक होते, मडगाव (Margao) येथील ‘रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर’ या शाळेचे मुख्याध्यापक, अनंत अग्नी.

गोव्यातल्या (Goa) विविध सामाजिक, भाषिक चळवळींत अनंत अग्नी यांचा सक्रिय सहभाग आहे. ‘शिक्षक’ या उदात्त व्यवसायाचा तर त्यांचा अनुभव तीन दशकांचा आहे. शिक्षणाच्या समाजभिमुखतेचे महत्व जाणणारे आणि ती प्रत्यक्षात आणू पाहणारे जे अवघे शिक्षक असतील त्यात अनंत अग्नी हे नाव नक्कीच ठळक असेल. त्यामुळे ‘चार भिंतीं’च्या बाहेर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (Student) जडणघडणीचे सार आणि अंतरंग शिक्षकांसमोर मांडण्यासाठी ते सर्वस्वी योग्य होतेच.

‘शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी कायम मित्र असावा आणि विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण, स्वाभिमानी, आनंदी बनण्याच्या मार्गावर त्यांना शिक्षकांकडून आत्मविश्वास आणि आधार मिळावा.’ हेच सूत्र या कार्यशाळेत अनंत अग्नी यांनी मांडले. विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास शाळेतल्या वर्ग नावाच्या चार भिंतींआड होणे शक्य आहे का? अनंत अग्नी यांच्यामध्ये ‘नाही’ हेच या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यांच्या मते, जर विद्यार्थ्यात सामाजिक भान जागवायचे असेल तर त्यांना औपचारिक शालेय ज्ञानाबरोबर वास्तववादी आणि व्यावहारिक शिक्षण देणेही गरजेचे आहे. सारेच विद्यार्थी औपचारिक शिक्षणात हुशार नसतात अशा वेळी शिक्षकाने (Teacher) या विद्यार्थ्यांचे अन्य गुण हेरणे व त्या दृष्टीने त्याला दिशा निर्देशन करणे महत्त्वाचे आहे.

शिक्षक आणि कार्यकर्ता या नात्याने स्वतः अनंत अग्नी यांनी आतापर्यंत हजारो मुलांना विविध सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत सामील करून घेतले आहे. त्यांना साहित्यसंमेलने, समता परिषद, चर्चासत्रे यात सामावून घेतले आहे. आज त्यातील प्रत्येकजणांनी सामाजिक जीवनात आपले स्थान निर्माण केले आहे. पत्रकारिता, कला संस्कृती, साहित्य या क्षेत्रात ते सारे महत्त्वाचे योगदान देत आहेत.

पण विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात समाजाभिमुख बनवावे कसे? अनंत अग्नी यांच्या म्हणण्याप्रमाणे अगदी सुरुवातीला, स्नेहसंमेलने, नाटक इत्यादी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना हेतुपूर्वक सामील करून घेणे गरजेचे आहे. ज्यातून आयोजन, संघटन यासारखी कौशल्ये विद्यार्थी शिकू शकतील. त्याशिवाय सामाजिक वास्तवाचे भान त्यांना आणून देण्यासाठी, ग्रामीण भागातही निवासी शिबिरांचे आयोजन झाले पाहिजे. अशाच एका निवासी शिबिरामधली घटना उदाहरण म्हणून त्यांनी सांगितली. ग्रामीण भागात निवासी शिबिरासाठी गेलेल्या एका शहरी विद्यार्थिनीला, तिथल्या घरातील विजेचे दिवे मंद दिवे आणि साधी राहणी पाहून ते कसे जगू शकतात हा प्रश्न पडला. त्यावेळी तिला अनंत अग्नी यांच्याकडून प्रथमच, ‘गरज’ आणि ‘स्वार्थ’ या दोन गोष्टीमधल्या फरकाचा धडा मिळाला.

अनंत अग्नी मुख्याध्यापक असलेल्या शाळेत इतर सर्वसामान्य क्लब बरोबरच, ‘नागरिक क्लब’, ‘वाचक-लेखक क्लब’ स्थापन झाले आहेत, जे विद्यार्थी स्वतःच चालवतात. चार भिंतींपलीकडचे शिक्षण हेच तर असते, जिथे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे सहजीवन विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अवकाश निर्माण करते. एक चांगल्या शिक्षकाबरोबर वर्गाबाहेर चाललेली दोन पावले विद्यार्थ्यांना संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनवतात. अनंत अग्नी म्हणतात, ‘भविष्यात, एखाद्या शिक्षकाने कुठला विषय शिकवला होता ते विद्यार्थी एखादेवेळी विसरेल पण त्या शिक्षकाने त्याच्या जीवनावर टाकलेला प्रभाव त्याला आयुष्यभर आठवेल.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT