Wildlife : रानडुकरांचा त्रास: एक पर्याय असाही... Dainik
ब्लॉग

रानडुकरांचा त्रास: एक पर्याय असाही...

दैनिक गोमन्तक

या संदर्भात मध्यप्रदेशचे भूतपूर्व वन्यजीव संरक्षक श्री पाबला व जाने माने वन्य जीवांचे अभ्यासक डॉ .जॉनसिंग  यांनी   मार्च  20,2021 मध्ये एक टिपण भारत शासनाला सादर केले आहे. त्यात ते लिहितात,“ मनुष्य प्राणी आणि वन्यजीव (Wildlife) यांचा संघर्ष ही आज वन्य जीव संरक्षणाच्या दृष्टीने महाभयंकर अडचण बनली आहे. हत्ती,  बिबटे,  वाघ आणि अस्वले यांच्यामुळे दरवर्षी सुमारे 1000 जण दगावतात,  तर याच्या अनेक पट व्यक्तींना इजा होते.  दरवर्षी हत्ती,  रानडुकरे, नीलगाय, काळवीट,  गवे यांच्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या पिकाची आणि मालमत्तेची नुकसानी होते. या संकटाला तोंड देण्यास  सामान्य लोक हतबल आहेत,  कारण या जनावरांना घरातून,  शेतातून (Farming) हाकलून द्यायलासुद्धा वन विभागाची (Forest Department) अधिकृत परवानगी मिळवावी लागते.”This best ways to deal with Wildlife pig problem sad98

वन्य जीव संरक्षण कायद्याचे हत्यार वापरून देशभर सध्या जी मनमानी सुरू आहे, त्याचा रानडुकरामुळे होणारे शेतीचे मोठे नुकसान आणि शेतकऱ्यांना त्या विरुद्ध काहीही करणे अशक्य असणे हा मोठा भाग आहे. अखेर खूप कटकटीनंतर रानडुक्कर मारले गेले तरी त्याचे मांस न खाता ते जाळुन नष्ट केले जाते. माझा मित्र शिलांजन भट्टाचार्य म्हणतो की, अशा रीतीने हे मांस नष्ट करणे हा इकॉलॉजिकल अपराध आहे. ते परत अन्न चक्रामध्ये आणलेच गेले पाहिजे. मग ते माणसांनी खाऊन अथवा आज धोक्यात असलेल्या गिधाडांनी खाऊन असो. सध्या भारतात दोन प्रकारच्या समस्या आहेत: सधन शहरी लोक अतोनात खाऊन लठ्ठ होणे आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पुरेसे अन्न विशेषतः प्रोटीन, खनिजे, जीवनसत्वे न मिळाल्याने आरोग्य खालावणे.

या संदर्भात कैलाश मल्होत्रांच्या सहकार्याने मी रानडुकरांच्या उपद्रवाचा अभ्यास सुरू केला आहे. रानडुकरे संख्येने भराभर वाढत राहतात. एका वर्षात त्यांची संख्या सहज दुप्पट होऊ शकते. ते घनदाट जंगलापासून माळरानापर्यंतच्या खूप वेगवेगळ्या अधिवासांत आढळतात. ही जीवजाती कुठल्याही निकषावर धोकाग्रस्त नाही. भारताच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या या विषयाचे फक्त दोन अभ्यास भरतपूर राष्ट्रीय उद्यानात झालेले आहेत. त्यातील 2010 च्या अभ्यासाप्रमाणे दर चौरस किलोमीटरला 15 रानडुकरे आढळतात. शिवाय असे दिसते की वीस वर्षात त्यांची संख्या सातपट वाढलेली आहे. या हिशेबाने भारतात अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने यांचे क्षेत्र वगळता इतर अरण्य प्रदेशात 40 लक्ष रानडुकरे असायला हवी.

भारतात भरपूर माळराने आहेत आणि तिथे आणखी दहा लक्ष रानडुकरे सहज भेटतील. अशी माळरानेसुद्धा सोडून जिथे मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्याचे पीक आहे तिथे या पिकाकडे आकर्षित होऊन रानडुकरे खूप प्रमाणात गावांजवळ वस्तीला आलेली आहेत. India biodiversity portal वर भारतीय जीवजातींची माहिती व्यवस्थित संकलित केलेली आहे. त्या माहितीवरून रानडुकरे देशाच्या सर्व प्रांतांत आढळतात.

रानडुकरांची वीण इतक्या झपाट्याने होते की त्यांची संख्या एका वर्षात सहज दुप्पट होऊ शकते. तेव्हा आज आपल्या देशात दरसाली 20 ते 50 लक्ष रानडुकरे मारली तरी त्यांची संख्या घटण्याची सुतराम शक्यता नाही. प्रौढ रानडुकराचे वजन 50 ते 100 किलोग्राम भरते. त्यांचे केवळ मांस नाही तर कलेजा इत्यादी इतर इंद्रिये ही पौष्टिक असतात. शिवाय त्यांचे सुळे, ताठर केस ह्यानाही मागणी आहे एवढंच. रानडुकरे ग्रामीण जनतेला उपलब्ध करून दिली तर त्यातून प्रोटीन, खनिजे, जीवनसत्वे यांचे कुपोषण कमी होण्याला चांगला हातभार लाभेल. शिवाय इतरही काही रोख कमाई होऊ शकते. मनुष्य जात प्रथमपासून सर्वभक्षी आहे. शुद्ध शाकाहार हा मानवाच्या इतिहासात अगदी अलीकडे सुमारे 2500 वर्षांपूर्वी जैन धर्मियांमध्ये सुरू झाला आणि काही प्रमाणात हिंदू जातींमध्ये पण पसरला. आजही मुस्लिमांचा अपवाद वगळता 80% टक्क्यांहून भारतीय गावडुकरे खाल्ली नाहीत तरी रानडुकरे आवडीने खातात.

रानडुकरांच्या शिकारीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सरदार दरकदार घोड्यावरून पाठलाग करत रानडुकरांना भाला मारून शिकार करत. अशाच शिकारीतील अपघातात शहाजी राजे भोसले हे 1664 इसवीत मृत्यू पावले. देशभर अनेक ग्राम समाज वर्षातून एकदा सामूहिक शिकार करून त्यात रानडुकराना मारत. शेतकरीसुद्धा कायद्याने परवानगी नसूनही रानडुकराची शिकार करतात ही वस्तुस्थिती आहे.

तुम्हाला रानडुकराच्या बाबतीत जी काय माहिती असेल ती समजावून घेण्याच्या उद्दिष्टाने आम्ही हा प्रयत्न करतो आहोत. आमच्या डोळ्यांपुढे खालील मुद्दे आहेत:

(1) वर्षानुवर्षे रानडुकरांची संख्या वाढताना दिसते आहे काय?, (2) ते नव्या-नव्या अधिवासांत पसरत आहेत काय?

(3) त्यांचा उपद्रव वाढतो आहे काय? या उपद्रवाचे दोन पैलू आहेत

(अ) शेतीची नासधूस होणे व (आ) माणसावर हल्ला होऊन इजा होणे,

(4) कोण-कोणत्या समाजातील लोक रानडुकरे खातात?

(5) पूर्वी सामूहिक अथवा वैयक्तिकरित्या त्यांची शिकार कशी केली जात होती काय? आजही कायद्याला न जुमानत शिकार केली जाते का? \

(अ) सामूहिक शिकारीच्या काय पद्धती होत्या?

(आ) वैयक्तिक शिकारीच्या काय पद्धती होत्या?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT