मास्टर प्राईस  Dainik Gomantak
ब्लॉग

मास्टर प्राईस

न्यूयॉर्कच्या हडसन यार्डमध्ये थॉमस हिथरवीक यांनी निर्माण केलेला ‘वॅसल’ हा मध्यवर्ती भाग आहे. 2500 पायऱ्या, एकमेकांशी जुळलेले 154 गुंतागुंतीचे चढाव, सोळा मजले अशी व्यामिश्र रचना असलेली ही उत्तुंग बांधणी गौतमने फार वेधकपणे आपल्या छायाचित्रात पकडली आहे.

दैनिक गोमन्तक

गौतम कामत बांबोळकर ‘गोवा कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स’चा (Goa College of Fine Arts) माजी विद्यार्थी. बांदोडा, फोंडा हे त्याचे गाव. सध्या तो अमेरिकेत असतो. अभिमानाची गोष्ट म्हणजे गौतमच्या ‘मॅन मेड केव्हज’ ही फोटो सिरीज (Photo series) आणि ‘रीइमॅजिन्डस वॅसल’ या फोटोसाठी त्याला अत्यंत प्रतिष्ठेचा ‘आर्किटेक्चर मास्टर प्राईस फॉर 2021 इंटेरियर आर्किटेक्चर फोटोग्राफी’ हा पुरस्कार ‘पब्लिक इंटेरियर’ (Public interior) या गटातून प्राप्त झालेला आहे. त्याचे दोन्ही फोटो ‘बेस्ट ऑफ बेस्ट’ (Best Of Best) म्हणून घोषित झालेले आहेत.

‘द आर्किटेक्चर फोटोग्राफी मास्टर प्राइस’ हा पुरस्कार बांधकाम क्षेत्रात घेतलेल्या उत्कृष्ट फोटोसाठी देण्यात येतो. जगभर घेतल्या जाणाऱ्या स्थापत्यविषयक छायाचित्रांचा सन्मान व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्थापत्यविषयक एक्स्टेरियर, इंटेरियर आणि इतर प्रकारच्या छायाचित्रांचा समावेश या स्पर्धेत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असणाऱ्या जगभरच्या तज्ञांचा समावेश या स्पर्धेच्या ज्युरी मंडळात असतो. स्थापत्य, अंतर्गत सजावट. कला, पत्रकार, शिक्षण अशा क्षेत्रात काम करून स्थापत्यशास्त्राला अधिक विकसित करणारे लोक या स्पर्धेशी निगडीत आहेत. गौतम कामत बांबोळकर सध्या न्युयॉर्क शहरात गुगलसाठी इंटरॅक्शन डिझायन विभागात काम करतो.

गौतम लिहितो, जेव्हा तो 9 व्या स्ट्रीटवर असलेल्या पाथ स्टेशनच्या पायर्‍या उतरत होता, एक जटील पोत असलेले केबल पाईप त्याच्या माथ्यावर संमोहित करणाऱ्या रचनेद्वारे अगदी अनंतापर्यंत पसरले होते. ही रचना एका मानवी गुहेपेक्षा कमी नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavisha 06 November 2024: शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करताय सावधान... जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT